गावातल्या सर्वसामान्य कुटूंबात जन्म झालेले “नसिरुद्दीन शाह” असे झाले सुपरस्टार अभिनेते…
कुछ होश नहीं रहता, कुछ ध्यान नहीं रहता, इंसान मोहब्बत में इंसान नहीं रहता – सरफरोश
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण देश अजूनही पूर्णपणे स्वातंत्र्य झाला नव्हता. १५ ऑगस्ट ला फक्त नावालाच स्वातंत्र्य होतं. देश धार्मिक – जातीय तेढ हे स्वातंत्र्य मिळण्यापासून मात्र वंचित होता. देश अभिव्यक्त होण्यासाठीच्या स्वातंत्त्र्यालढ्या साठी लढत होता. स्वातंत्र्य मिळून तीन वर्षे झाले होते. २० जुलै चा दिवस उजाडला. आणि उत्तरप्रदेश मधल्या बाराबंकी या गावात एका नवीन अभिनय ” शाह ” पर्वाचा जन्म झाला.
आणि आता खरोखर अभिनय स्वातंत्र्य मिळाल्यासारखंच होतं. कारण मोठेपणी स्वतःच्या मनाला साजेशी असलेली गोष्ट करणाऱ्या आणि अ’न्या’यावि’रु’द्ध आवाज उठवणाऱ्या माणसामध्ये त्यांची वर्णी लागली होती.
- लहानपणी पासूनचं चित्रपट पाहण्याची असणारी ओढ ही त्यांचं मोठेपणी असणारं भविष्य होतं. त्यांनाही वाटलं नव्हतं की आपण आपल्या स्वतःच्या हाताने स्वतःचं भविष्य हे अभिनय क्षेत्रात लिहू म्हणून ! हळुहळु नसिरउद्दीन शाह हे त्यांच्या आयुष्याचे पदर उलगडत गेले. त्यांची सिनेमा पहायची आवड आयुष्यात गोड बनून आली. पण आपल्या पोरानं इतर भावांसारखे शिकावे, डॉ नाहीतर इंजिनिअर व्हावं असं त्यांच्या घरच्यांचा गोड गै’रसमज होता.
कारण पोराचे ग्रहमान दुसरीकडे फिरले होते. जिथं त्याला अभिव्यक्त होता येणार होतं. मुक्त काम करता येणार होतं. पुढं मोठं झाल्यानंतर त्यांनी अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालयातुन पदवीधरचं शिक्षण पूर्ण केलं. सिनेमा क्षेत्रात अभिनेता म्हणून काम करण्याची इचछा ही ध्येयात परावर्तित झाली. म्हणून शाह यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रयत्न करून तीन वर्षांच्या कोर्से ला ऍडमिशन घेतलं.
नाटक नावाची गोष्ट त्यांच्या आयुष्यात आली. स्तानिसलावस्की सारखे अनेक अभिनय पद्धत समजून सांगणारे गुरू त्यांच्या डोळ्यांसमोर आले. मग सुरुवात झाली त्यांच्या कामातल्या आविष्काराची. राष्ट्रीय नाटय विद्यालयातून शिकून त्यांनी काही काळ खूप नाटकं केलीत. नाटकातून स्वतःला घडवलं. आणि मग मुंबई ची वाट धरली.
मुंबई गाठल्यानंतर त्यांच्या सं’घर्षाची सुरुवात झाली. त्यांना पहिला चित्रपट मिळाला ” हम पांच ” . १९८० ला आलेली ही फिल्म मात्र व्यापारीकरणाच्या दृष्टीने चांगली चालली नाही. पण त्यात ज्या पात्राची भूमिका ” नसिरुद्दीन शाह ” यांनी बजावली ती लोकांना खूप आवडली. लक्षात राहणारं काम त्यांनी त्यात केलं. भूमिका समजून घेऊन काम करणं, त्या भूमिकेला काय खरी गरज आहे ? हे शोधून काढणं, अभ्यास करणं, नैसर्गिक अभिनय रंगमंचावर किंवा चित्रपट मध्ये प्रयन्तपूर्वक करणं अश्या अनेक गोष्टींमुळे त्यांचं बॉलीवूड मध्ये सुरुवातीलाच खूप कौतुक झालं.
पुढं बाप मुलाच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ” मासूम ” मध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. प्रत्येक पात्रात वेगळे पणा आणणाऱ्या अभिनेत्याच्या यादी मध्ये त्यांचं नाव समाविष्ट झालं. सिनेमा मोठा बिग बजेट असू किंवा कमी बजेट वाला, नसीरजी सगळीकडे काम करू लागले. त्या काळी त्यांच्या समोर अभिनय सम्राट दिलीप कुमार, नवीन आलेले अनिल कपूर आणि जॅकी श्राफ अश्या अभिनेत्यांची दहाड होती. यासर्वांमध्ये त्यांना त्यांच्या अभिनयाची जिवंत असलेली जाणीव ,उणीव समजून जि’वंत ठेवायची होती. गुलजार यांचा इजाजत नंतर त्रिदेव ,आणि हॉलीवुड फ़िल्म ‘द लीग ऑफ एक्सट्रा ऑर्डिनरी जेंटलमेन’ यामधून त्यांनी त्यांची ओळख ही गडद करून टाकली.
- नसीरउद्दीन शाह यांनी नेहमी कामाला महत्व दिले. ते सगळ्या प्रकारचे चित्रपट करायला लागले. प्रत्येक भूमिका वेगळी लक्षात राहील असं काम करून करू लागले. पैश्यापेक्षा सिनेमाच्या कथेला ते जास्त प्राधान्य देऊ लागले.
ते नेहमी म्हणत की ‘मैं खुद को खुशकिस्मत मानता हूं कि मुझे इतने मौके मिले, लेकिन मैं व्यापारिक फ़िल्मों से अभी संतुष्ट नहीं हूँ।’ पर मैं जब कोई ऐसीं फिल्म करता जिसको मिट्टी का सुगंध हो , तो ओ करनें मे अलग ही अनुभव प्रतीत होता हैं ” ।..
२००६ मध्ये ” इकबाल ” या सिनेमासाठी राष्ट्रीय अभिनेत्याचा खूप मोठा सन्मान त्यांना मिळाला. इकबाल मधील त्यांची भूमिका कुणीच विसरू शकत नाही. मातीचा लहेजा आणि गोडवा हा आजही इकबाल पाहिल्यावर आपल्यात दरवळतो ही खूप मोठी कमाई आहे.
स्पर्श ,आक्रोश ,चक्र, मिरझा गालिब ,अश्या अनेक चित्रपटामधून त्यांनी नैसर्गिक अभिनय शैलीचं जणू नेतृत्वचं केलं. संगीत नाटक अकादमी सारखे अनेक उच्चतम पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आज हिंदी चित्रपट क्षेत्रात ते एक खूप महत्वाचे अभिनेते आहेत. आज वयाची सत्तरी पर्यंत पोहचलेले ” शाह ” हे वयाच्या तिशीनंतरच्या असणाऱ्या ऊर्जेने काम करत आहेत. हे त्यांचं जिवंत असलेलं मूर्त यश ! ..अनेक चित्रपट, लघुपट आणि नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या या अवलिया अभिनेत्याचा आज वाढदिवस !
आजच्या दिवशी या हरहुन्नरी अवलिया अभिनेत्याचा जन्म झाला होता. काम करताना कामातला आनंद शोधून काम पूर्णत्वाला कसं घेऊन जायचं ? आपलं काम अनंत काळ टिकून कसं ठेवायचं ? कामात आणि जगण्यात वेगळेपणा कसा निर्माण करायचा ? अश्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर ७० वर्षांत मिळवून दाखवणाऱ्या अभिनेता ” नसिरुद्दीन शाह ” यांना कडक सलाम !
- नसिरुद्दीन शाह सर जी आप जियों हजारों साल !
स्टार मराठी कडुन आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..