‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील नटू काकाचे झाले दुःखद निधन, मालिकेची शूटिंग…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो!, नुकतीच एक धक्कादायक आणि तितकीच दुःखदायक बातमी हाती आलीय की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सुप्रसिद्ध मालिकेतील कलाकार नट्टूकाका म्हणजेच श्री. घनश्याम नायक यांचे गळ्याच्या कॅ’न्सर मुळे दुःखद नि’ध’न झाले आहे. ते ६७ वर्षांचे होते. मालाड येथील सूचक हॉ’स्पिटलमध्ये त्यांनी संध्याकाळी ५.३० वा. अखेरचा श्वास घेतला. मालिकेचे सर्वेसर्वा, कर्ताधरता श्री. असित मोदी यांनी स्वतः सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे.

चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. असा नट्टू काकांनी कॅ’न्स’रच्या उपचारानंतर मनोमन नि’र्धा’र केला होता. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक हे कर्करोगाशी झुंज देत होते.

See also  'मिरझापुर - २' मधील हा लोकप्रिय अभिनेता लवकरच अडकणार लग्न बंधनात, पहा कोण आहे त्याची होणारी नवरी...

दरम्यान, ठीक होऊन त्यांनी मुंबईत पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवातही केली होती. मागेच घनश्याम यांनी ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या उपचाराबद्दल आणि करोना परिस्थितीबद्दल सांगितलं. “मी अगदी ठीक आहे. हा इतका मोठा मुद्दा नाही. खरं तर, उद्या तुम्ही मला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एपिसोडमध्ये पाहू शकणार आहात. हा एक विशेष एपिसोड आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना माझं काम पुन्हा आवडेल,” असे घनश्याम म्हणाले होते.

सप्टेंबर २०२० मध्ये ६७ वर्षीय घनश्याम यांना कर्करोग झाल्याचे कळाले होते. त्यानंतर घनश्याम नायक यांच्या कुटुंबियांनी किमोथेरपी सुरू केली होती. घनश्याम नायक यांना एप्रिल महिन्यात कॅ’न्स’रचं नि’दा’न झालं होतं. मात्र कॅ’न्स’रशी सामना करत असतानां देखील त्यांनी त्यांचे काम सोडले नाही. तर वयाच्या ७७व्या वर्षी देखील ते चित्रीकरण करत राहिले. यामुळे नेटकरी देखील त्यांचे कौतुक करत होते.

See also  अभिनेता वरून धवन नताशासोबत अडकला विवाह बंधनात, जाणून घ्या कोण आहेत नताशा दलाल!

आपल्या उपचारांविषयी बोलताना घनश्याम म्हणाले होते की, “मला आशा आहे की मी लवकरच पूर्णपणे ठीक होईल. लवकरच मुंबईत चित्रीकरणाला सुरुवात होईल आणि मला काम करायला मिळेल. पुन्हा काम करण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. मी प्रत्येक महिन्याला केमोथेरपी घेत आहे. डॉक्टरांनी मला सांगितले की मी काम करू शकतो. मला फक्त सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची आहे की मी ठीक आहे.”

घनश्याम पुढे बोलतांना हे ही म्हणाले होते की, मी सकारात्मक विचार करणारा आहे आणि मी निराश होऊ शकतं नाही किंवा न’कारात्मक विचार करत नाही. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे.” आमच्या स्टार मराठीच्या सर्व परिवारातर्फे नट्टूकाकांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

See also  अखेर बाहुबली सुपरस्टार प्रभासचं ठरलं लग्न, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment