“नट्टू काका शेवटच्या क्षणांत जगता जगता म’रत होते, जेवण पाणी सुद्धा…”, बागा ने सांगितले शेवटचे क्षण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

काल तुमचे आमचे सर्वांचे लाडके नट्टू काका यांनी अखेरचा श्वास घेतला. ते खूप लोकप्रिय असे अभिनेते होते. तारक मेहता सोबत त्यांनी अनेक फिल्म व नाटकामध्ये कामे केलेली आहे. जेष्ठ अभिनेते होते. त्यांच्यामुळे एक खूप मोठी पोकळी इंडस्ट्रीत निर्माण झालेली आहे. त्या नट्टू काकांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली !…

शेवटच्या क्षणी नट्टू काका कसे जगत होते ? नट्टू काका शेवटच्या काही दिवसांत खूप परेशान झाले होते. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. या जेष्ठ अभिनेत्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ज्याला तारक मेहता टीम सोबत इंडस्ट्रीत ले अनेक दिग्गज आले होते.

See also  कधीकाळी फक्त 100 रुपयांसाठी पेट्रोल पंपावर काम करायची हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, कारण...

अंत्यसंस्काराचे फोटोही समोर आले आहेत. दरम्यान, शोमध्ये बागाची भूमिका साकारणाऱ्या तन्मय वकारिया यांनी घनश्याम नायक यांचे शेवटचे दिवस कसे गेले हे सांगितले. त्यामुळे पुन्हा जुन्या गोष्टीला उजाळा मिळणार आहे. तन्मय यांनी शेवटच्या दिवसांची स्थिती सांगितली आहे. घनश्याम नायक यांच्या आजारपणानंतर तन्मय वकारिया म्हणजेच ‘बागा’ त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात होते.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तन्मय म्हणाले, ‘ते गेल्या २-३ महिन्यांपासून खूप अडचणीत होते आणि मला वाटते की ते आता एका चांगल्या ठिकाणी आहेत. कारण अडचणीतुन सुटून मोकळे झालेले आहेत.

मी त्यांच्या मुलाच्या सतत संपर्कात होतो. त्याने सांगितले होते की नट्टू काकांना खूप वेदना होत आहेत आणि यामुळे ते विचित्र वागू लागले आहेत. ते खाऊ शकत नव्हते किंवा पाणी पिऊ शकत नव्हते. ते अतिशय कठीण काळातून जात होते. आता ते देवाच्याकडे सुरक्षित असतील. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. ‘

See also  मुकेश अंबानींची लाडकी बहीण आहे खूपच सुंदर, तिने केले होते लवमॅरेज पण त्यानंतर मात्र जे झाले ते...

तन्मय पुढे म्हणाले, ‘मी एक चांगला माणूस म्हणून घनश्यामजींना नेहमी लक्षात ठेवेन. माझ्या आयुष्यात. मला वाटत नाही की मी त्यांच्यासारख्या जिवाला जीव देणाऱ्या कोणाला पुन्हा आयुष्यात भेटू शकेन.

ते खूप साधे जीवन जगणारे होते. बोलावं तेवढं कमीच आहे त्यांच्याबाबत. मी त्यांना कधीही कोणाबद्दल वाईट बोलताना ऐकले नाही. ते नेहमी सकारात्मक गोष्टी सांगायचे. नेहमी त्याच्या कामाबद्दल उत्सुक असायचे. मी आणि संपूर्ण ‘तारक मेहता’ कुटुंब त्यांना आता इथून पुढे दररोज मिस करणार आहे.

घनश्याम नायक यांना कदाचित ‘नट्टू काका’च्या भूमिकेमुळे घराघरात ओळख मिळाली असली तरी, पण सहा दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक संस्मरणीय असे पात्र साकारले आहेत. त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी ‘लाडला’, ‘क्रांतिवीर’, ‘बरसात’, ‘घटक’, ‘चायना गेट’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लज्जा’, ‘तेरे नाम’ , ‘खाकी’ आणि ‘चोरी चोरी’ सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment