मृ’त्यूपश्चात तब्बल एवढी संपत्ती सोडून गेले “तारक मेहता” मधील नटु काका, जाणून घ्या किती होती त्यांची संपत्ती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

तारक मेहता का उल्टा चश्मा’, या हिंदी टेलिव्हिजन मध्ये सर्वांत जास्त लोकप्रिय टीव्ही मालिका आहे. टीआरपी मध्ये सुद्धा एक नंबर आहे. बरं, एवढंच नाहीतर जास्त काळ चालणारी मालिका म्हणून सुद्धा आघाडीवर आहे. आज भारतभर प्रत्येक घरात मालिका आणि त्यातील सर्वच पात्र लोकप्रिय झालेले आहेत. या मालिकेने अशा अनेक स्टार्सना ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली आहे, जे अनेक दशकांपासून या इंडस्ट्रीचा भाग होते;पण स्टारडम खूप दूर होते.

यामधील असेच एक अभिनेते म्हणजे घनश्याम नायक अहो म्हणजेच तुमचे आमचे ‘तारक मेहता’चा नट्टू काका. आता तर ओळखलं असेलच त्यांना तुम्ही. पण एक दुःखद बातमी म्हणजे ते आज आपल्यात नाहीत. आज ते अनंतात विलीन झालेले आहेत. कॅन्सर ग्रस्त नट्टू काकांचे 77 व्या वर्षी नि’ध’न झालं आहे. हा त्यांच्या सर्व चाहत्यांना, कुटुंबातील लोकांना खूप मोठा ध’क्का आहे. त्यातून सावरण्यासाठी देव त्यांना बळ देवो.

See also  प्रसिद्ध निर्मीती एकता कपूर आहे तब्बल इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!

घनश्याम नायक हे सर्वसामान्य प्रेक्षक लोकांमध्ये नट्टू काका म्हणून लोकप्रिय होते, परंतु गेल्या पाच दशकांहून अधिक काळातील त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी डझनभर तरी इतर पात्र साकारले आहेत.

काय काय कामे केली आहेत त्यांनी ? त्यांनी ‘लाडला’, ‘क्रांतिवीर’, ‘बरसात’, ‘चायना गेट’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘तेरे नाम’, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. घनश्याम नायक यांनी सलमान खान पासून श्रीदेवी, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, काजोल आणि अमिताभ बच्चन पर्यंतच्या टॉप स्टार्स सोबत काम केले, पण प्रसिद्धीची उंची गाठली नाही. हीच एक खंत आहे.

घनश्याम नायक यांना छोट्या छोट्या भूमिका करून या इंडस्ट्रीत टिकून राहावे लागले. घनश्याम नायक यांनी 1960 पासून च्या चित्रपट मासूममधून बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या 57 वर्षांच्या कारकिर्दीत, घनश्याम नायक अर्थात नटू काकांनी सुमारे 200 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. तसेच 350 हिंदी मालिका केल्या, एवढंच नाहीतर 100 गुजराती नाटकांमध्येही, घनश्याम नायक यांनी आपली अभिनयाची ताकत दाखवली आहे.

See also  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील नटू काकाचे झाले दुःखद निधन, मालिकेची शूटिंग...

घनश्याम नायक हे एक उत्तम गायक सुद्धा आहेत आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी देखील गायली आहेत. जेव्हा घनश्याम नायक हे नाट्यगृहात काम करायचे, तेव्हा त्यांना रोजची फी म्हणून फक्त 11 रुपये मिळत असत, पण आज त्यांची कमाई लाखांमध्ये आहे.

पण एक काळ असा ही होता की जेव्हा घनश्याम नायक यांना पैशासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागले. ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हा घनश्याम नायक हे थिएटरमध्ये नाटकात काम करायचे.

त्यावेळी तासन् तास काम करूनही त्यांना फक्त 3 रुपये मिळत असत. 60 आणि 70 च्या दशकात, जेव्हा घनश्याम नायक हे चित्रपटांमध्ये काम करायला लागले, तेव्हा त्यांना तीन दिवसांच्या शूटिंगसाठी फक्त 90 रुपये मिळत असत. काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी हा खुलासा केला.

See also  अभिनेत्री राधिका आपटेचा न्यू'ड व्हिडिओ लीक झाल्यानंतर, ती म्हणाली की, "ड्रायव्हरपासून ते वॉचमेनपर्यंत सगळे मला..."

एका मीडिया रिपोर्टनुसार घनश्याम नायक यांची संपत्ती 23 करोड रुपये आहे. त्यामुळे आज अनंतात विलीन होताना ते कुटुंबातील लोकांसाठी एवढी संपत्ती सोडून गेले आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली न्यूज टीमकडून.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment