यंदा पितृपक्ष व नवरात्रात आहे महिनाभराचे अंतर तब्बल १६५ वर्षांनी जुळून आला आहे हा अद्भूत योग, का आहे महत्वाचा जाणून घ्या.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

सन २०२० या वर्षात अनेक शुभफलदायी अद्भुत योग जुळून आलेत. बुधवार, ०२ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरु होऊन गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी पितृ पंधरवडा समाप्त होईल.

दरवेळी भाद्रपद अमावास्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या झाली की, लगेच दुसऱ्या दिवशी घटनस्थापना म्हणजेच नवरात्रौत्सव प्रारंभ होतो. सन २०२० मध्ये मात्र, सर्वपित्री अमावास्या आणि घटस्थापना यांच्यात तब्बल एका महिन्याचे अंतर आहे. काय आहे याचे कारण ? चला जाणून घेऊया…

या वर्षीच्या अनेक सण उत्सवावेळी काही न काही योग जुळून येत आहेत. आषाढी एकादशीपासून चातुर्मासास प्रारंभ झाला आहे. यंदा विशेष म्हणजे हा काळ, ५ महिन्यांचा असून अश्विन महिना पुरुषोत्तम म्हणजेच अधिक मास असेल. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणजे श्राद्धविधीचा पंधरवडा, म्हणजेच पूर्वजांचे स्मरण करण्याचा काळ मानला जातो. पितृपक्षात आपले पितर पितृलोकातून पृथ्वीवर येतात, अशी मान्यता आहे.

See also  या 7 राशी ची इच्छा पूर्ण करणार श्री स्वामी समर्थ या राशींना भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार…

श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे पितरांचे पुण्य स्मरण. पितृपक्षाच्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन आदी विधी करायचे असतात. आपल्या कुटुंबातील पितरांचे स्मरण-पूजन महालय श्राद्धात पिंडरूपाने केले जाते.

पितृपक्षानंतर लगेचच नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. मात्र, यंदा अश्विन पुरुषोत्तम म्हणजेच अधिक महिना असल्यामुळे नवरात्रौत्सव अधिक अश्विन महिन्यानंतर साजरा केला जाईल. सुमारे १६५ वर्षांनी असा योग आला आहे, असे धर्मशास्त्र पंडित सांगतात.

इतकेच नव्हे तर १६५ वर्षांनंतर सन २०२० मध्ये एकाच वर्षात लीप इयर (२९ फेब्रुवारी) आणि अधिक महिना असा अद्भूत योग जुळून आला आहे.

चातुर्मास सुरू झाल्यावर विवाह, मुंज यांसारखी इतरही मंगलकार्ये केली जात नाहीत. चातुर्मासात उपवास आणि साधना यांना अधिक महत्त्व असते. चातुर्मासाचा काळ कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला समाप्त होतो. यावर्षी गुरुवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी पितृपक्ष समाप्त होणार आहे. यानंतर शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्थापना होईल.

See also  या ७ राशीला मिळणार कुबेर देवाचा खजिना, सर्व आर्थिक स-मस्यांतून होणार कायमची मुक्ती...

अधिक मासाला, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. सन २०२० मध्ये शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२० रोजी अधिक अश्विन महिना सुरू होत आहे. याच्या समाप्तीनंतर नवरात्राला सुरुवात होईल. या वर्षी १७ ऑक्टोबर रोजी नवरात्रौत्सवारंभ, २६ ऑक्टोबर रोजी दसरा म्हणजचे विजयादशमी तर १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी आणि २५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यानंतर चातुर्मासाची सांगता होईल.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो. त्यास ३६५ दिवस, ६ तास लागतात. या दरम्यान इंग्रजी कॅलेंडरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात.

हे अंतर तीन वर्षांनी सुमारे एका महिन्याचे होते. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी आणि अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. अतिरिक्त दिवसांचा महिना म्हणूनच याला अधिक महिना म्हटले जाते.

See also  आज श्री गजानन महाराज करणार चमत्कार, या 7 राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…

अधिक महिन्यात सूर्य सक्रांत होत नाही. म्हणजे सूर्य राशीपरिवर्तन करीत नाही. त्यामुळे हा महिना मलीन होतो, अशी मान्यता आहे. म्हणूनच याला मलमास असेही म्हणतात.

प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व वेगळे आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींच्या नावावरून त्यांचे वेगळेपण आणि महत्त्व कळते. अधिक महिन्यातील एकादशीला विशेष महत्त्व असल्याचे शास्त्र सांगते. सन २०२० मध्ये तब्बल २६ एकादशी असतील.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment