नवरात्रोत्सव 2020 : यावर्षी दुर्गामातेचे येण्या-जाण्याचे वाहन कोणते असेल? धर्मशास्त्रानुसार या वाहनाचा देशावर कसा राहील प्रभाव? जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हिंदू धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि देवी भागवत पुराणानुसार, नवरात्रात दुर्गामातेचेचे आगमन भविष्यातील घटनांविषयीचे संकेत देत असते. यंदाच्या २०२० या वर्षी देवीचे वाहन कोणते असेल? आणि त्यानुसार देशभरात भविष्यात घडणाऱ्या घटनां व त्यावर तज्ञ जाणकारांनी वर्तवलेल्या अंदाजांचा भाविक वाचकांच्या जिज्ञासा पूर्तीसाठी घेतलेला हा सांगोपांग आढावा…

यंदाचा नवरात्रोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्थापना होऊन नवरात्रारंभ होणार आहे. वास्तविक पाहता सर्वपित्री अमावास्या म्हणजेच पितृपक्ष समाप्तीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी घटस्थापना होऊन नवरात्रारंभ होतो.

मात्र, यंदा अश्विन महिना पुरुषोत्तम मास असल्याने पितृपक्ष आणि नवरात्रीत तब्बल एका महिन्याचे अंतर पडले. सामान्यपणे दर अडीच ते तीन वर्षांनी हा महिना अधिक येतो, जो प्रथम धरला जातो आणि मग नियमित महिना येतो. यामुळे भविकांना दुर्गामातेच्या आगमनाची तब्बल एक महिना वाट पाहावी लागेल.

See also  यंदाची महाशिवरात्री आहे खूपच खास, बनतोय हा महायोग, जाणून घ्या शिवपूजन शुभ मुहूर्त, व्रतविधी, शास्त्रीय महत्व...

हिंदू धर्मशास्त्र आणि देवी भागवत पुराणानुसार, दुर्गादेवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होते, याबाबत सविस्तर भाष्य केलेले आहे.

‘शशि सूर्य गजरुढा शनिभौमै तुरंगमे।
गुरौशुक्रेच दोलायां बुधे नौकाप्रकीर्तिता॥’

या श्लोकात आठवड्यातील सातही दिवसांनुसार, देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून होणार याचे यथार्थ वर्णन सांगितलेले आहे. वरील श्लोकानुसार आठवड्यातील दिवसांनुसार वेगवेगळ्या वाहनांवरून दुर्गामातेचे आगमन होत असते.

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना…

  • सोमवार किंवा रविवारी होत असेल, तर याचा अर्थ दुर्गामातेचे हत्तीवर आरुढ होऊन आगमन होणार आहे.
  • शनिवार आणि मंगळवारी नवरात्रारंभ होणार असेल, तर दुर्गामातेचे आगमन अश्वारुढ होणार आहे.
  • गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी घटस्थापना असेल, तर दुर्गामातेचे आगमन डोली, पालखी मधून होणार आहे.
  • बुधवारी असेल, तर दुर्गामातेचे आगमन नौकेतून होणार आहे, असे पुराणशास्त्र सांगते.

दुर्गा देवीचे वाहन आणि प्रभाव : यंदा सन २०२० मध्ये निज अश्विन शुद्ध प्रतिपदा १७ ऑक्टोबर २०२० रोजी आहे. याचाच अर्थ घटस्थापना म्हणजेच नवरात्रारंभ शनिवारी होणार आहे. देवी भागवत पुराणातील श्लोकानुसार दुर्गामातेचे आगामन यावर्षी अश्वारुढ होईल. अश्वावरून देवीचे आगमन म्हणजे छत्र भंग, शेजारी देशांशी युद्ध, वादळ, तुफान यांचे संकेत असल्याचे सांगितले जाते.

See also  या 'एका घटनेनंतर' कर्मवीर भाऊराव पाटलांनी आयुष्यात परत कधीच पायात चप्पल घातली नाही, कारण...

आगामी काही काळात काही राज्यांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र होऊन सत्ताबदल होऊ शकतो. सरकारला काही धोरण वा निर्णयामुळे जनतेचा मोठा रोष वा विरोध पत्करावा लागू शकतो. कृषी क्षेत्रासाठी आगामी काळ सामान्य असेल.

तर देशाच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी वा जास्त झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागू शकते. यामुळे शेतकरी बांधवांना काही समस्या, अडचणी, अडथळे अशा आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, असा अंदाज वर्तवला जात असल्याचे सांगितले जाते.

हा झाला दुर्गामातेच्या येतांनाच्या वाहनाचा प्रभाव आणि भाकीत.

  • दुर्गामाता जातांना सुद्धा वेगवेगळ्या वाहनावर बसून जाते.

शशि सूर्य दिने यदि सा विजया महिषागमने रुज शोककरा। शनि भौमदिने यदि सा विजया चरणायुध यानि करी विकला।।
बुधशुक्र दिने यदि सा विजया गजवाहन गा शुभ वृष्टिकरा। सुरराजगुरौ यदि सा विजया नरवाहन गा शुभ सौख्य करा॥

यंदा दुर्गामाता रविवारी जाणार आहे. म्हणजेच वरील श्लोकानुसार जातांना देवीचे वाहन महिषा म्हणजे रेडा असणार आहे. आणि हिंदुधर्मशास्त्र आणि देवी पुराणानुसार देवीचे रेड्यावर बसून जाणे, याचा अर्थ देशाला रोगराई, आजार आणि त्यातून उद्भवणारे दुःख, शोक यांचा सामना करावा लागणार.

See also  एका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी, गुंतवणूकदार झाले मालामाल, शेअर मार्केटची कमाल!

वरील धार्मिक श्लोक हे आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी हजारो वर्षांपासून लिहून ठेवलेले आहेत.
टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Leave a Comment