यंदाच्या वर्षी नवरात्री मध्ये अशाप्रकारे करा घटस्थापना, प्रसन्न होईल देवी दुर्गामाता, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजन विधी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

यंदा शारदीय नवरात्रीमध्ये आदी शक्तीच्या उपासनेचा विशेष नऊ दिवसांचा काळ शनिवार दि. १७ ऑक्टोबर २०२० पासून सुरु होत आहे.

शुभ मुहूर्त: २०२० मधे महाराष्ट्रात घटस्थपना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ०६ वा. १७ मिनिटे ते १० वा. २५ मिनिटे असा असेल. (कालावधी ०४ तास ०८ मिनिटे इतका आहे.)

काही अपरिहार्य कारणास्तव हा मुहूर्त कालावधी टळून गेल्यास: अभिजित मुहूर्त – सकाळी ११वा. ०२ मिनिटे ते ११ वा. ४९ मिनिटे आहे. (कालावधी – ४७ मिनिटे)

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गामातेची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच श्री दुर्गा यंत्राचीही स्थापना करून घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. जाणून घ्या, यंदाचा देवी दुर्गामातेचा घटस्थापना विधी…

घटस्थापना विधी: घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य – नवरात्रोत्सवात शेतातील काळी माती, एक पत्रावळी, पाच प्रकारचे धान्य यामध्ये गहू, साळी, इतर कडधान्य इ., कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, सुटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी सूत/दोरा, धूप-दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल इत्यादी पूजेचे साहित्य आवश्यक असते.

 • अमावस्येच्या दिवशी सर्व पूजासामग्री जमवावी.
 • एकाच वेळी भोजन करावे.
 • घटस्थापनेसाठी स्वच्छ जागेची निवड करावी.
 • प्रतिपदेला सकाळी लवकर उठून नदी, तलाव, विहीर किंवा सोईस्कर ठिकाणी स्नान करावे.
 • चौरंग किंवा पाटावर देवीची प्रतिमा स्थापन करून रत्नभूषण, मुक्ताहराने सुशोभित करावी.
 • फोटो नसल्यास दुर्गायंत्राची स्थापना करावी.
 • त्यासमोर पवित्र ठिकाणची किंवा शेतातील माती आणून पवित्र वेदी वेदी म्हणजे शेत तयार करून त्यामध्ये पाच प्रकारचे धान्य पेरावेत.
 • पीठ पूजेकरिता चौरंगाच्या दक्षिणेला कलश ठेवावा. त्यामध्ये तीर्थ-जल ठेवावे. एखादे रत्न किंवा सुवर्णही त्या कलशात ठेवावे.
 • विधिवत मंत्रोच्चाराबरोबर पूजन करावे.
 • पूजा झाल्यानंतर देवीसमोर गायन-वादन करावे.
 • उत्सवात जमिनीवर झोपावे.
 • कुमारिकांचे पूजन करावे.
See also  कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते? जाणून घ्या यंदाच्या वर्षीचे कोजागिरी महत्त्व, पूजन विधी आणि श्रीलक्ष्मी स्तोत्र...

(अधिक महितीस्तव : एक किंवा दोन वर्षाची कन्या कुमारिका, तीन वर्षांची कालिका, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षांची सुभद्रा मानली जाते. दहा वर्र्षांपुढील कन्येला पूजनासाठी वर्ज मानले आहे.)

नऊ दिवस उपवास करणे शक्य नसल्यास तीन दिवस उपवास करावा. भक्तिभावाने सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या रात्री भगवती पूजन केल्याने सर्व शुभफलं व पुण्यप्राप्ती होते.

नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावावी परंतु तत्पूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात…

नवरात्रीमध्ये देवी दुर्गामातेसमोर नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते. देवीसमोर एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी.

मंत्र महोदधि (मंत्राच्या शास्त्र पुस्तका) नुसार अग्नीसमोर करण्यात आलेल्या जपाचा साधकाला हजारपट जास्त फळ प्राप्त होते. असे म्हटले जाते की, दीपम घृत युतम दक्षे, तेल युत: च वामत:। अर्थ – तुपाचा दिवस देवीच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा.

See also  तृतीयपंथीयांवर असे केले जातात अं'त्यसंस्कार, चुकूनही तुम्ही हे पाहू नका, अन्यथा भोगावे लागतील हे भयानक परिणाम...

अखंड ज्योत संपूर्ण नऊ दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे. यासाठी एका छोट्या दिव्याचा उपयोग करावा. अखंड दिव्यामध्ये तेल, तूप टाकायचे असल्यास किंवा वात ठीक करायची असल्यास छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून बाजूला ठेवावा.

अखंड दिवा ज्योत ठीक करताना विझला तर छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा.

टीप : टीप : वरील माहिती ।।श्री देवी भागवत पुराण।। या हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment