नवरात्रीमध्ये श्री दुर्गामातेच्या या ९ रूपांची आराधना होते, जाणून घ्या कोणती आहेत ९ रूपे, कोणत्या वैशिष्ट्यांमुळे त्यांना नवदुर्गा म्हणतात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

Shailaputri Sanghasri 2010 Arnab Dutta

शैलपुत्री स्वरुप : दुर्गा मातेचे पहिले रूप आहे-शैलपुत्री. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या/मुलगी. दुर्गामातेच्या या रुपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळता येते. विचारांनी विचलित मन देवीच्या या रूपाच्या स्मरणमात्रे खंबीर,निडर आणि शांत होण्यास मदत होते.

Brahmacharini

ब्रह्मचारिणी स्वरुप : ब्रम्हचर्यामुळे बलवर्धन होते. ब्रम्हचर्य म्हणजेच , “आपले अस्तित्व अनंत आहे याची सदोदित जाण ठेवणे, मी निव्वळ शरीर नाही तर मी ज्योती स्वरूप आहे” आपण दुर्गामातेच्या या रुपाची आराधना करतो तेंव्हा आपल्या मध्ये ब्रम्हचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि तेंव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो.

null

चन्द्रघंटा स्वरुप : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गामातेच्या चंद्रघंटा या रुपाची आराधना केली जाते.या रुपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात.चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते. दुर्गामातेच्या या रूपाच्या फक्त नामोच्चारानेच आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते. जेंव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेंव्हा आपले मन,आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतिक आहे.

See also  हि एक सवय आणू शकते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप मोठी स'म'स्या, ऐकून विश्वास बसणार नाही!

null

कूष्माण्डा स्वरुप : कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते.हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे.हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कूष्माण्डाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते.

null

स्कंदमाता स्वरुप : स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे.बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे. स्कंद म्हणजे तज्ञ, निष्णात.सामान्यपणे जे तज्ञ,प्रविण असतात ते उद्धट असतात. पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे. दुर्गामातेच्या या रुपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात.

See also  यंदा वर्षभरात फक्त एकदाच आहे सोमवती अमावस्या, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व, विधी शुभाशुभ योग इ. सविस्तर...

1570169153 909 sri katyayani durga temple at varansi

कात्यायनी स्वरुप : दुर्गामातेच्या मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी या दुर्गामातेच्या रूपाची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण,वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. हि देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतिक आहे. आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय.

null

कालरात्रि स्वरुप : काल म्हणजे वेळ,समय, काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे.रात्री म्हणजे गाढ विश्रांती,शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांती शिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो कां? कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती.

null

महागौरी स्वरुप : गौर म्हणजे गोरा, सफेद. सफेद रंग शुद्धतेचे प्रतिक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते.

See also  प्रेमात पडल्यावर आपल्या प्रेयसीसाठी या गोष्टी करतात मुलं, ज्या लहानसहान गोष्टी मूलींना देखील खूप आवडतात...

null

सिद्धिधात्री स्वरुप : जी सर्व सिद्धी देते ती सिद्धीधात्री.जे हवे आहे,जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा, गरजेपेक्षा ज्यादा मिळणे म्हणजे ‘सिद्धी’. साधकाला अध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात. गुरुपरंपरेला येथे खूप महत्व आहे. साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी. सिद्धीधात्री सर्व इच्छापुर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते.गुरुकृपेमुळे “प्राविण्य आणि मुक्ती”या सिद्धीधात्रीने दिलेल्या देणग्या आहेत.

(सौजन्य : विकिपीडिया )

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment