समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव “दाऊद” असे म्हणत नवाब मलिक यांनी केले वानखेडेंवर आरोप…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान हा मागील काही दिवसांपासून ङ्रग्ज केसमध्ये फसल्यामुळे पोलीस कारागृहात बंद आहे. परंतु आर्यन खानचे प्रकरण दाबून टाकण्याच्या प्रयत्नात एनसीबीचे समीर वानखेडे यांचे नाव समोर आल्याने आता या प्रकरणाला एकंदरीत आणखी फाटे फुटत आहेत.
मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे. माझे वडील हिंदू आहेत आणि आई मुस्लिम होती. माझी खाजगी महत्त्वपूर्ण कागदपत्रे अशाप्रकारे ट्विटरवर टाकणे, हे अतिशय अपमानास्पद आहे, असे म्हणत एनसीबीचे ङायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ‘दा’ऊ’द’ असल्याचे म्हटले होते.
वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी धर्म बदलल्याचा आरोप करताना त्यांचे जन्म प्रमाणपत्रच जाहीर केले आहे. याविषयी समीर वानखेडे म्हणाले की,”महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या वैयक्तिक आ’रोपांमुळे मी खूप दुःखी आहे. हा माझ्या कुटुंबांचा धडधडीत अ’पमान आहे.”
माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेङे हे राज्याच्या एक्सरसाईज खात्यातून वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत. ते हिंदू होते. तर माझी आई दिवंगत झहिदा ही मुस्लिम होती. मी धर्मनिरपेक्ष आणि बहुधर्मीय कुटुंबातील आहे व याचा मला अभिमान आहे.मी 2006 मध्ये ङॉ. शबाना कुरेशी हिच्याशी कायदेशीररीत्या विवाह केला होता. तर 2016 मध्ये कायदेशीररीत्या घटस्फो’ट सुद्धा घेतला होता. 2017 मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर हिच्याशी विवाह केला, असे वानखेडे यांनी आपल्या लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
अशाप्रकारे सोशल मीडियावर माझी वैयक्तिक कागदपत्रे जाहीर करणे, हे माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी धो’क्याचे आहे. माझी माझ्या कुटुंबांची प्रतिष्ठा नष्ट करण्याचा यामागे घाणेरडा हेतू आहे. राज्याचे मंत्री मागील काही दिवसांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, याचे मला अतिशय दुःख होत आहे. असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.