एकेकाळी 2 रुपए कमावण्यासाठी लग्नात नाचायचा, पण आज हाच आहे बॉलीवुडचा प्रसिद्ध स्टार अभिनेता आणि करोडपती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो आपण आपल्या फेवरेट स्टार्स ची एक झलक पाहण्यासाठी किती खटपट करतो बरं..त्यांची प्रत्येक गोष्ट आपण आवडीने फॉलो करतो. परंतु या स्टार्सना स्वतःचे करियर बनवण्यासाठी देखील अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली. तेव्हा कुठे आज त्यांना लक्जरी लाईफस्टाइल सोबत भरघोस प्रसिद्धी देखील मिळते.

19 मे 1974 रोजी उत्तर प्रदेशातील बुढाना या लहानशा गावात जन्मलेले नवाज यांची आज इंडस्ट्रीमधील टॉप स्टारच्या लिस्टमध्ये ओळख आहे. पडद्यावर नवनवीन प्रकारच्या भूमिका साकारत त्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले.

paan singh tomar Irrfan 571 855

नवाज यांच्या आयुष्यात एक काळ असा होता की, जेव्हा ते फक्त 2-2 रुपए मिळवण्यासाठी लग्नात ङान्स करायचे. हे सर्व त्यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, लहान असताना तो आपल्या मित्रांसोबत नृत्य करत असे. कारण तेव्हा लोक लग्न सोहळ्यात बराच खर्च करत असत. त्यामुळे नवाज शेजारच्या अनेक लग्नांमध्ये संपूर्ण दिवसभर नाचून ते कमीतकमी 2-3 रुपये कमवायचे. परंतु त्या काळात त्यांना 2-3 रुपए पण त्यांना खूप मोठे वाटायचे.

See also  या मोठ्या कारणामुळे अभिषेक बच्चनने केले होते त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठ्या ऐश्वर्या रायशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला त्यांचे चित्रपट पाहून तर समजते की, नवाज हे एक वाखाणलेले कलाकार आहेत. परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आपली वॉचमेनची नोकरी मुळीच सोडली नाही. नोकरीमध्ये तर त्यांना मुळीच रुची नव्हती. कारण अगदी सुरुवातीपासूनच त्यांना अभिनयाचे वेङ होते. या अभिनय कलेमुळे त्यांनी आपली नोकरी सोडली व ते मुंबईत दाखल झाले.

Nawazuddin Siddiqui

पुढे ते म्हटले की, मला अभिनेता व्हायचे आहे. असे म्हटल्यावर ते माझी उंची व चेहरा पाहायचे. पण मला खात्री होती की, मी अभिनेता नक्कीच बनू शकतो. कारण अभिनेता होण्यासाठी चेहरा नव्हे तर अभिनय कला पाहिली जाते. म्हणून मी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहून मुंबईत आलो. तसे पाहिले तर माझ्याकडे अभिनेता होण्यासारखे काही व्यक्तिमत्त्व नव्हते. पण मला कोणत्याही परिस्थितीत माझे स्वप्न पूर्ण करायचे होते. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली. शेवटी मी चाहत्यांच्या हृदयात स्वतःचे स्थान मिळवले.

See also  1990 च्या काळातील सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक, आता संगीतापासून दूर करतात हे काम...

अभिनेता नवाज यांच्या कारकीर्दीची सुरुवात 1999 मध्ये “सरफरोश” या चित्रपटाने झाली. 2012 पर्यंत नवाज यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे. परंतु त्यांना काहीच ओळख मिळाली नाही. त्यानंतर अनुराग कश्यपने त्यांना फैजल बनवून “गँग्स ऑफ वासेपुर” मध्ये काम दिले. तेव्हापासून नवाजुद्दीन प्रत्येक भूमिकेत स्वतःचा जीव ओतून काम करू लागला.

58802599

ब्लॅक फ्रायडे आणि कहानी या चित्रपटांतून अभिनेते नवाज यांना बॉलीवुड मध्ये खरी ओळख मिळाली. त्यानंतर सुपरस्टार सलमान खान यांच्या ‘कि’क’ चित्रपटांनंतर त्यांना स्टार म्हणून ओळख मिळाली. अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी हे आपल्या 9 भावंडात सर्वांत मोठे होते. आपल्या दोन मुलांसोबत राहतात. पत्नी आलिया सोबत ते विभक्त राहतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment