नवाब मलिकांच्या रडारवर असलेले NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे आहे एवढी संपत्ती, पहा किती आहे संपत्ती…
NCB मुंबई झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणं नवाब मलिक यांच्याकडून काही थांबत नाही आहेत. अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी नेते नवाब मलिक हे रोज नवे खुलासे करत आहेत. आज तर त्यांनी सांगितले की समीर वानखेडे दिसतात तेवढे साधे नाहीत. पडद्याआड च्या गोष्टी कळल्या तर आपण हैराण व्हाल.
समीर वानखेडे यांचे शर्ट 60 हजारांचा आहे तर पॅन्ट 70 हजारांची. बरं एवढंच नाहीतर हातात असणारे घड्याळ 20 ते 30 लाखांचे आहे. आता या नवाब मलिक यांच्या आरोपाने महाराष्ट्र मध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. ज्यावर समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर ने प्रत्युत्तर दिले आहे. सांगितले आहे की हे सगळं खोटं आहे. उद्या हे जिरा राईस हॉटेल मधून मागवला तरी म्हणतील की सरकारी अधिकारी असं एवढं महागडं खातात का. तर असं सगळं सध्या महाराष्ट्रात सुरू आहे.
नवाब मलिक पत्रकार परिषदेत आ’रोप करताना म्हणाले, ” साधा सा सरकारी अधिकारी एवढं अलिशान आणि महागडं आयुष्य कसकाय जगत असेल ? तर ते सगळं मोठ मोठ्या लोकांना जाळ्यात अडकवून करोडो रुपयांची खं’डणी वसुल केल्यानं होत आहे. अनेकांना या गोष्टी मुळे हा प्रश्न पडलेला आहे की समोर वानखेडे ज्यांच्या बद्दल आ’रोप केले जात आहेत. त्यांची संपत्ती नेमकी किती असेल ? तर आता आपण तेच जाणून घेणार आहोत.
समीर वानखेडे यांच्या कडे जी काही थोडी फार स्वरूपात संपत्ती आहे ती त्यांच्या जाहिदा वानखेडे या आईची आहे. ज्यांचं काही कारणास्तव 2015 मध्ये निधन झालेलं आहे. समीर वानखेडे हे दरवर्षी जिथं काम करतात त्या विभागात यांच्या कडे असलेल्या संपत्ती बद्दल माहिती देत असतात. त्यानुसार सध्या समीर वानखेडे यांकडे 4 एकर जमीन आहे. जी वाशीम जिल्ह्यात आहे.
आई जाहिदा वानखेडे यांनी दिलेलं 800 स्कवॉयर फूट घर सुद्धा सध्या समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. तसेच 1999 मध्ये घेतलेला एक फ्लॅट आहे. जो आई च्या नावावर आहे. मुंबईत दोन घरे आहेत. जी सध्या भाड्याने दिलेली आहेत. समीर वानखेडे यांची आंटी ची कॅ’न्सर ने नि’धन झालं. त्यांचं सुद्धा मुंबईत महत्त्व असलेल्या ठिकाणी 1000 squre फूट चा फ्लॅट आहे ऑफिस टाईफ. जो सुद्धा वानखेडे यांच्या ताब्यात आहे.
अश्या प्रकारे वानखेडे यांच्यावर नाही म्हणलं तरी बरीच प्रॉपर्टी आहे. आणि नवाब मलिक यांनी आरोप केलेली प्रॉपर्टी खरी निघाली तर मग नक्कीच अधिकारी करोडो रुपयांचे मालिक असतील पण मग फ्रॉड असणं ही समोर येईल. त्यामुळे लवकर या प्रकरणाचे निकाल लागले पाहिजे.