एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा भाजपवर हल्ला, वाचा कोण काय म्हणाले ?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आलेल्या एकनाथ खडसे यांची अडचणी वाढताना दिसत आहेत. एकनाथ खडसे यांच्या जवायला अटक केल्यानंतर ईडी ने खडसे यांचीही चौकशी सुरू आहे. खडसे यांच्या कन्याही सध्या ईडी कार्यालयात त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजप दबावतंत्राचा वापर करत आहे- छगन भूजबळ

खडसे यांच्या ईडी मार्फत होणार्‍या चौकशीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “हा भाजपच्या दबावतंत्राचा एक भाग आहे. भाजपमधून बाहेर पडलयावर काय त्रास भोगावा लागू शकतो हे त्यांना दाखवायचं असेल.”

See also  बनावट कथा रचून आमच्या आमदारांचे निलंबन केलंय – फडणवीसांचा गंभीर आरोप

नाशिक मध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. छगन भूजबळ पुढे म्हणाले, “इतर पक्षात असलेल्या लोकांना त्रास दिला जातो आणि ते त्यांच्या पक्षात गेल्यास त्यांचे सर्व गुन्हे माफ करण्यात येतात. सध्या भाजपकडून या दबावतंत्राचा मोठ्या प्रमाणात प्रयोग सुरू आहे.”

एकनाथ खडसे यांना  राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न- जयंत पाटील

एकनाथ खडसे यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. खडसे यांच्या विरोधात ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात अद्याप कोणतेही तथ्य आढळले नाही किंवा कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. हे फक्त त्यांच्या विरोधात रचलेले कुंभाड आहे.

नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र : एकनाथ खडसे

सकाळी ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी म्हटले की, “या कारवाईमागे सूडाचा वास येत आहे. भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्यानंतरच माझ्यावर कारवाई सुरू झाली. राजकीय हेतूने हे सर्व काही सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू असून, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.”

See also  तिसरी लाट येणार आहे तर घाबरून घरीच बसायचे का? राज ठाकरेंचा धक्कादायक सवाल
Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment