अमिताभ बच्चन यांची सिलसिला आधी या प्रसिद्ध अभिनेत्रीला ऑफर झाला होता; पण या कारणामुळे दिला नकार…
बॉलिवूड मध्ये काही गोष्टी अश्या ही घडून गेल्या आहेत की ज्या अनेकांना माहीत नसतात. पडद्याआड त्या गोष्टी होत असतात. म्हणजे आज आपण ज्यांचा सिनेमा लोकप्रिय होताना पाहतो. त्यातल्या कलाकारांना प्रेम देतो; पण हे माहीत असते का की त्यात इतर नामवंत कलाकारांना त्या त्या भूमिका करण्यासाठी विचारलं गेलं होतं…
अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमा बद्दल असं झालं होतं. तो सिनेमा कोणता हाच आता आपल्याला प्रश्न पडला असेल तर चला मग सविस्तर जाणून घेऊ.
सिलसिला’ (Silsila) हा गाजलेला सिनेमा. अमिताभ आणि रेखाचे प्रेम फुलत असतानाच अमिताभचा वैमानिक भाऊ शशी कपूरचे अपघाती निधन होते आणि अमिताभला भावाच्या पत्नीशी म्हणजे जयाशी लग्न करावे लागते. तर रेखाचे लग्न संजीव कुमारसोबत होते. पण होळीच्या निमित्ताने अमिताभ-रेखा यांचे प्रेम पुन्हा जागे होते.
असे कथानक असलेला 1981 साली प्रदर्शित झालेल ‘सिलसिला’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. याच चित्रपटासाठी नीतू कपूरला (Neetu Kapoor) विचारणा झाली होती. पण कदाचित तिच्या नशिबी हा सिनेमा नव्हताच.होय, नीतू खुद्द ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या (Super Dancer Chapter 4) सेटवर हा खुलासा केला. बघा म्हणजे एवढी जुनी गोष्ट कधी खुलाश्यातून बाहेर आली.
बरं फक्त सिनेमा नाकारला एवढंच नाहीतर हा सिनेमा नाकारण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले. काय सांगितले नितु कपूर यांनी कारण माहितेय ? नीतू कपूर यांनी सांगितले, ‘यश चोप्रांनी मला सिलसिला या चित्रपटासाठी विचारले होते. पण मी त्यांना नकार दिला होता. कारण होते माझे लग्न. यश चोप्रा यांनी मला या चित्रपटाबद्दल विचारले त्याचदरम्यान मी ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न करणार होते.
पुढे नितु कपूर म्हणाल्या यशजी, मी हा सिनेमा करू शकणार नाही. माझे लग्न होतेय, असे मी त्यांना म्हणाले होते. अगदी मी माझी एंन्गेजमेंट रिंगही त्यांना दाखवली होती. यानंतरही यशजींनी माझे अनेक प्रकारे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण मी नकार दिला.’
स्मिता साकारणार होती जयाची भूमिका… ‘सिलसिला’च्या कास्टबद्दल खुद्द यश चोप्रा एका मुलाखतीत बोलले होते. या चित्रपटात स्मिता पाटीलला जया बच्चनचा रोल तर परवीन बाबीला रेखाचा रोल देण्यात आला होता. ही स्टारकास्ट फायनल झाल्यावर यश चोप्रा अमिताभ यांच्याकडे गेलेत. तुम्ही स्टारकास्टबद्दल समाधानी आहात का? असा प्रश्न अमिताभ यांनी यशजींना केला.
यावर नाही, मला यात जया व रेखा यांना घ्यायची इच्छा आहे, असे ते यावर म्हणाले. अमिताभ यांना हरकत नव्हती. पण जया व रेखा यांचा होकार मिळवणार कोण? असा प्रश्न होता. तुम्ही दोघींना राजी करू शकलात तर मी तयार आहे, असे अमिताभ यशजींना म्हणाले आणि इथुन पुढे अमिताभ वगळता सिनेमाचा अख्खा अंदाजच बदलला.
अमिताभ बच्चन यांची इच्छा होती की जया आणि रेखा सोबत सिनेमा करावा. तर अशी आहे ही जुनी पण आता नवी होणारी गोष्ट. जी अशीच इतर गोष्टी मधून star मराठी आपल्याला ऐकवत जाणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.