बॉलिवूड मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री होतेय दुसऱ्यांदा आई, होणाऱ्या मुलासाठी तिने कमावून ठेवली कोट्यवधींची संपत्ती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मनोरंजन क्षेत्रात आज अनेक सेलिब्रिटी लोकं हे लाखोंच्या पलीकडं कमवतात. एका चित्रपटात काम करण्यासाठी ही सेलिब्रिटी मंडळी करोडो रुपये मानधन घेतात. नेहा धुपिया माहिती आहे का ? नेहा धुपिया कडे आज करोडो रुपयांची प्रॉपर्टी आहे. तर नेमकी किती आहे ते जाणून घेऊयात. सविस्तर कारण नेहा धुपिया आता दुसऱ्यांदा आई होणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. मिस युनिव्हर्स इंडियाचा खिताब जिंकल्यानंतर नेहाने अभिनय विश्वात प्रवेश केला. काल नेहाने तिचा 41 वा वाढदिवस साजरा केला आहे. नेहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आम्ही तुम्हाला तिच्या संपत्ती बद्दल सांगणार आहोत.

cute smiling image of Neha Dhupia

नेहाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्हीच्या दुनियेतून केली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. नेहाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात कयामत: सिटी अंडर थ्रेट या चित्रपटातून केली. यानंतर ती ज्युली चित्रपटात दिसली आणि यामुळे तिला ओळख मिळाली.

See also  अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी आहे वाईट बातमी, जाणून घ्या काय आहे बातमी...

Trendcelebsnow च्या अहवालानुसार, नेहा धुपिया सुमारे 37 कोटींच्या मालमत्तेची मालक आहे. नेहाची जास्त कमाई चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमधून येते. याशिवाय तिने पॅनासोनिक, गीतांजली ग्रुप, मोबाईल सारख्या अनेक ब्रॅण्ड्सची सुद्धा जाहिरात केलेली आहे. ज्यातून ही तिला करोडो रुपये मिळत असतात. नेहा सोशल मीडियावर ही फार कार्यरत असते. तिचे इथे ही लाखो चाहते आहेत.

abd96c8e167d03131f7685180aab13ac

नेहा धुपिया ने काम केलेले बॉलिवूड चित्रपट खूप आहेत. जरी नेहाला आज बॉलिवूडमध्ये हवे ते स्थान मिळवता आलेले नसले. तरी तिने हिंदीसह पंजाबी, तेलगू, मल्याळम अशा अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने एक चालीस की लोकल, चुप चुप के, हेलिकॉप्टर ईला, हिंदी मीडियम अशा बॉलिवूड मध्ये लोकप्रिय असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

See also  देवमाणूस मालिकेतील ही फॉरेनर नक्की आहे तरी कोण? याआधी तिने केलं होतं इथे काम जाणून घ्या.

नेहा VOG टॉक शो सह BFF होस्ट करते. ज्यामध्ये ती बॉलिवूड सेलेब्सशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलते. याशिवाय नेहा एमटीव्ही रोडीज या रिअॅलिटी शोला जज सुद्धा करते.

नेहा धुपियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने 2018 मध्ये अंगद बेदीशी लग्न केले. अंगद आणि नेहाने लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. अंगद आणि नेहाने लग्नाबद्दल कोणालाही कळू दिले नव्हते. दोघांना एक मुलगी सुद्धा आहे मेहर नावाची. आता नेहा दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना तिच्या दुसऱ्या गर्भधारणेविषयी माहिती दिली होती.

नेहा आता पुन्हा आई होणार असल्याने तिचे सोशल मीडियावर असलेले सर्व चाहते खूप खुश आहेत. आणि असणार चं ना कारण जिला पडद्यावर लाईक केलं जातं तिला सोशल मीडियावर खऱ्या आयुष्यात कशी जगतेय ? काय चाललंय ही माहिती मिळवण्यासाठी फोल्लो सुद्धा केले जाते. नेहा ला आई होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तिच्या आयुष्यात आनंद, सुख व समाधान नांदू.

See also  नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंडने शेयर केल्या आपल्या आठवणी, म्हणाला "नेहा कक्करने मला..."

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment