नेहा कक्करच्या लग्नात ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री इतकी नाचली कि…

बॉलिवूड ची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ने आजपर्यंत खूप गाणे गायले आहेत. त्यामधले बरेच गाणे सुपरहिट देखील झाले आहेत. नेहा कक्कर चे खूप चाहते आहेत तिचे इंस्टाग्राम वर ४६ मिलीअन फॉलोवर्स आहेत, त्यामुळे तिचे कोणतेही गाणे रीलीज झाले कि ते सुपरहिटच होते. नेहा कक्कर हिंदीच नाही तर पंजाबी गाणे देखील गाते. तिने आता नुकतेच रिंकू राजगुरू च्या मेकउप या चित्रपटासाठी मराठी गाणे देखील गायले होते

आता नुकतेच प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ने प्रसिद्ध बॉलिवूड गायक रोहन प्रीत सिंगशी लग्न केले. शनिवारी (24 ऑक्टोबर) ला नेहा कक्कर चे गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्न झाले आहे. नेहा कक्करच्या लग्नाचे अनेक व्हिडिओहि सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

नेहा कक्करच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात नेहा कक्कर आणि रोहनप्रीत जोरदार नाचताना दिसत आहेत. हे व्हिडिओ लग्नाच्या विधी नंतरचे आहेत ज्यात नेहा तिच्या सूरात नाचताना दिसत आहे. रोहनप्रीतही तिचे समर्थन करत आहे.

नेहा आणि रोहनप्रीत व्यतिरिक्त त्यांचे बरेच मित्र आणि कुटुंब जवळपास नृत्य करताना दिसत आहेत.व्हिडिओमध्ये नेहा गाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नेहाने तिच्या मधुर आवाजाने सगळ्यांचेच मन जिंकले. या विडिओमध्ये नेहा खूप भावनिक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

#NehuDaVyah 🪔 . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #love #Nehakakkar #UrvashiRautela

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor🇮🇳 (@urvashirautela) on

नेहा कक्कर आणि रोहन प्रीत सिंग यांचे लग्न 24 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये झाले. नेहा कक्करच्या रुग्णाच्या एक रीती मध्ये नेहा कक्करने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता, तर रोहनप्रीतने लाल आणि पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

मीडिया रिपोर्टनुसार नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत यांनी आधी दिल्लीत कोर्ट मॅरेज केली आणि त्यानंतर त्यांनी गुरुद्वाऱ्या मध्ये फेरे घेतले. नेहा कक्कर आणि रोहन प्रीत यांच्या लग्नाच्या बऱ्याच दिवसांपासून चर्च्या होत्या. नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न अतिशय वैयक्तिक मार्गाने झाले. या सोहळ्यात दोन्ही कुटुंबांचे सदस्य आणि त्यांचे काही मित्र सहभागी झाले होते. नेहा कक्कर ने को’रो’ना च्या कालावधीत लग्न करण्याचा निर्णय घेतला, म्हणूनच असे म्हणले जात आहे कि तिने आपल्या लग्नाची माहिती फारच थोड्या लोकांना सांगितली.

नेहा आणि रोहन यांच्या लग्नात पाहुण्यांशिवाय मोठं मोठे बॉलिवूड चे कलाकार हि आले होते. नेहा कक्करच्या लग्नात या कलाकारांनी जोरदार नृत्य आणि मजा केली. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगच्या लग्नात बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला हि पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

#NehuDaVyah ♥️♥️🌹🌹 . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #love #Nehakakkar #UrvashiRautela

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor🇮🇳 (@urvashirautela) on

उर्वशी रौतेला नेहाच्या लग्नात पोहोचली आणि तिने बरीच मजा, मस्ती केली आणि नृत्यदेखील केले. उर्वशी रौतेला ने नेहाच्या लग्नात नेहाचा भाऊ आणि गायक टोनी कक्कर याच्या बरोबर नृत्य केले. उर्वशीने टोनी सोबत इतका डान्स केला कि ती खूपच थकली. टोनी आणि उर्वशी यांच्या नृत्याचा व्हिडिओ टोनी कक्कर ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

नेहा कक्करच्या लग्नात उर्वशी रौतेला आणि टोनी कक्कर यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उर्वशी रौतेला चे बरेच चाहते आणि अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांना हा व्हिडिओ खूप आवडला. या लग्नात टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया, पंजाबी गीतकार बानी संधू आणि जस्सी लोहका या खास व्यक्ती उपस्तिथ होत्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment