लहानपणी २ रूमच्या घरात भाड्याने राहायची ही प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर, आज आहे करोडोंची मालकीण!

.

एक म्हण तुम्हाला माहीत असेल, ” कष्टाला फळ येतच ” ही. फळाची अपेक्षा करू नका, कष्ट मात्र जोमानं करा. एक दिवस असा येतो की आयुष्यातील सगळं दारिद्रय तो घेऊन जातो.

सुख समाधान, पैसा आणि बरच काही देऊन जातो. ज्याच्या वाट्याला संघर्ष येत नाही त्याच्याकडून कसलेच कष्ट होत नाहीत. मग फळ तर खुप लांबची गोष्ट.

जो संघर्ष करुन जगण्याची वाट शोधतो तो नेहमी यशाच्या शिखरावर असतो. आज आपण अत्यंत हलाखीच्या परिस्थिती बॉलीवूड मध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या नेहा कक्कड या गायकबद्दल माहिती जाणुन घेणार आहोत.

तिचा जन्म ६ जुन १९८८ ला उत्तराखंड मधील ऋषिकेश येथे झाला. तिची परिस्थिती खुप गरीब होती. आईवडील दिवस रात्र कष्ट करुन घर चालवत होते. त्यांचं घर सुद्धा भाड्याचं होतं. खुप लहान खोलीचं घर होतं. एका लाकडी टेबलावर तिच्या आईने किचन उभं केलं होतं. त्यावेळी तिचं सगळं आयुष्य सर्वसामान्य होतं. पण म्हणतात ना की कला कधी मरत नाही. तिच्या कुटुंबातील सगळयांना गायनाची खुप आवड होती.

मग नेहा आणि तिचा भाऊ यांच्या सुद्धा गायनाच्या तालमी होऊ लागल्या. पुढे जशी नेहा मोठी होऊ लागली तशी तिच्या आवाजातली जादु वाढायला लागली. ऋषिकेश मध्ये अनेक ठिकाणी तिचे व भावाचे गाण्याचे कार्यक्रम होऊ लागले. त्यामुळे घर चालवण्यात तिचाही काही हातभार येऊ लागला. तिचं खरं आयुष्य बदललं ते इंडियन आयडॉल मध्ये सहभागी झाल्यानंतर.

तिथे तिला ओळख आणि पैसे दोन्हीही भरपूर मिळू लागले. त्यानंतर २००८ ला तिनं एक गाणं गायलं होतं. नेहा द सिंगर या नावाने. ते त्यावेळी इतकं लोकांना आवडलं की तिला तिथुन पुढे बॉलिवूड मधुन गाण्यांच्या ऑफर येऊ लागल्या. त्या ऑफर स्वीकारून एकापेक्षा एक ती हिट गाणी देऊ लागली.

ती खुप लोकप्रिय झाली होती. कारण तिचा आवाज हीच खरी ओळख होती. लोकं गाणी एकूण अक्षरशः आवाजाच्या प्रेमात पडत होते. दरम्यानच्या काळात नेहाचं कुटुंब खुप सुधारलं. मुंबईत स्वतःच घर झालं. सगळे गुण्यागोविंदाने राहु लागले.

तिचं एक स्वप्न होतं की ज्या ठिकाणी मी भाड्याने राहिले त्याच शहरात माझा बंगला असेल. हे स्वप्न तिनं सत्यात उतरवलं आहे. तिने ऋषिकेश मध्ये एक आलिशान घर बांधलं आहे. सोशल मीडियावर जुन्या घराचे व नवीन बंगल्याचे फोटो तिने शेयर केले होते. त्यात तिनं असं म्हंटलय की परिस्थिती बघा किती बदलली.

आज नेहा बॉलीवूड ची सगळ्यात प्रसिद्ध आणि महागडी गायक आहे. तिच्याकडे अनेक गाड्या आहेत. मुंबईत दोन तीन ठिकाणी पैश्यांची प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ऋषिकेश मध्ये स्वतःचा बंगला आहे. तिनं हे सगळं तिच्या कष्टाच्या जोरावर मिळवलं आहे. तिच्या या प्रवासाला खुप सलाम. आणि पुढच्या आयुष्यासाठी खुप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment