नेहा कक्करने केले तिच्या पेक्षा 7 वर्षांनी लहान रोहनप्रीत सिंगशी लग्न, कारण…

बॉलिवूड प्लेबैक सिंगर नेहा कक्करने शनिवारी 24 ऑक्टोबर रोजी तिचा बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंगशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लॉ’क’डा’उ’नच्या दरम्यान नेहा आणि रोहनची भेट झाली आणि त्यादरम्यान दोघांमधील प्रेमसंबंध वाढत गेले आणि आता ते लग्नाच्या बंधनात बदलले आहेत. दोघांच्या वयात 7 वर्षांचा फरक आहे. तिचे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. नेहाच्या लग्नाची छायाचित्रे येथे पहा…

शनिवारी नेहाचे मोठ्या उत्साहात लग्न झाले. गुरुवारी सकाळी त्यांचे लग्न झाले आणि नंतर संध्याकाळी मित्र आणि कुटुंबीयांसह रॉयल सेलिब्रेशन आयोजित केले गेले होते. या रॉयल सेलिब्रेशनमध्ये नेहा कक्करने तिचा पती रोहनप्रीतसाठी एक विशेष गाणे देखील गायले होते. यासह त्याच्या सोबत आणि पाहुण्यांसोबत डान्स देखील केला.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीतसिंगचा रोमान्स सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये सर्वांनाच आवडला आहे. हा रोमान्स फक्त लग्नाआधीच नाही तर लग्नाच्या दिवशी आणि रीतिरिवाज करताना देखील दिसला होता, दोघेही संपूर्ण वेळ एकमेकांचा हात हातात घेऊन सोबत होते होते.

इतकेच नाही तर रोहनप्रीत नेहावर खूप म्हणजे खूप प्रेम करतो हे तिच्या लग्नाच्या व्हिडिओंवरून स्पष्ट झाले आहे की तो ज्या प्रकारे नेहाला पहात आहे आणि तिच्या कपाळाला पुन्हा पुन्हा किस करत आहे, तो खूपच क्युट आहे.

लग्नात नेहा आणि रोहनप्रीतच्या कुटुंबातील सदस्यांनी हजेरी लावली होती. या व्यतिरिक्त या लग्नात नेहाचे इंडस्ट्रीतील काही मित्रही आले होते, त्यांनी या लग्नात खूप मस्ती केली. इंडियन आयडॉलचे होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलसुद्धा नेहा कक्करच्या लग्नाचा एक भाग झाला होता. मनीष येथे ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. नेहा आणि मनीषचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला असून तो खूप व्हायरलही होत आहे.

लाल लेहंगा परिधान केलेली नेहा कक्कर खूपच सुंदर दिसत होती, तर रोहनप्रीतने लग्नात लाल रंगाची शेरवानी घातली होती. हे जोडपे आता सर्वांचे आवडीचे झाले आहे. या लग्नात नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर आणि बहीण सोनू कक्कर यांनीही बरीच मजा मस्ती केली. टोनीने आपल्या बहिणीसाठी गाणीही गायली.

नेहा कक्कर आणि रोहन प्रीत सिंग यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, आणि त्यांनी या प्रेमाला लवकरात लवकर लग्नात बदलले. त्यांनी त्यांच्या वयातील अंतराचा विचार केला नाही कारण त्यांचे प्रेम खूप दृढ होते. नेहाचे वय 32 वर्ष आहे तर रोहनचे वय मात्र 25 वर्ष आहे. या दोघांमध्ये तब्बल 7 वर्षांचे अंतर आहे.

Leave a Comment