“श्श् काळीज धडधडत नाहीए….तर कुणीतरी येतंय” अभिनेत्री नेहा पेंडसेच्या या पोस्टने सोशल मीडियावर केला धूमाकळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री नेहा पेंडसे ही आपल्या भन्नाट लुकमुळे चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडते. आपल्या अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य केले आहे. नेहा सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. आपल्या ग्लॅमरस फोटोज् मुळे ती सतत चर्चेत असते. परंतु आता देखील ती सोशल मीडियावरील आपल्या लेटेस्ट पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने इन्स्टाग्रामवर आपल्या नवीन प्रोजेक्टची माहिती दिली आहे. त्या चित्रपटाचे पोस्टर शेयर करत तिने लिहिले की,”श्श्…..! काळीज धडधडत नाहीए…कुणीतरी येतंय. “रावसाहेब” दिग्दर्शक : निखिल महाजन, लेखक : प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन निर्मिती : प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर, नेहा पेंडसे- बायस, जितेंद्र जोशी, निखिल महाजन.

See also  "हक्काच्या प्रेमाचं माणूस..." अगबाई सासूबाई मधील शुभ्राची पोस्ट सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल...

E60PVZnVIAIQAZ9

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने शेयर केलेल्या रावसाहेबच्या पोस्टरवर वन्य प्राण्यांचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाचे मोशन पोस्टर सुद्धा रिलीज करण्यात आले आहे. पण तरीही या चित्रपटात कोणते कलाकार असतील, हे मात्र अजूनही समजू शकलेले नाही.

अक्षय विलास बर्दापूरकर व प्लॅनेट मराठी एस.एस. प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत “रावसाहेब” या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे. तर हा चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे लेखन प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे आणि निखिल महाजन यांनी केले आहे.

nehhea 202107656597

या चित्रपटाची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, नेहा पेंडसे बायस, जितेंद्र जोशी आणि निखिल महाजन यांनी केले आहे. या चित्रपटाविषयी अक्षय बर्दापूरकर म्हणाले की, “निखिल सोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. आमची मैत्री फार जुनी असून मी निखिलचे काम अतिशय जवळून पाहिले आहे. निखिल एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे. वेगवेगळे संवेदनशील विषय अतिशय उत्तमरीत्या हाताळण्याची कला सुद्धा त्याच्या मध्ये आहे.”

See also  अभिनेत्री श्रुती मराठेचे पावसातील फोटो सोशल मीडियावर होत आहे खूपच व्हायरल...

त्याचप्रमाणे निखिल महाजन याने सांगितले की,”माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने “रावसाहेब” चे टिझर व पोस्टर भेटीस येत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना एकत्रित काम करायला मिळत आहे, हेच आमच्यासाठी लाखमोलाचे आहे. आता जास्त काही या चित्रपटाविषयी मी सांगणार नाही, परंतु हा चित्रपट सर्वांना नक्कीच आवडेल, ही मला खात्री आहे.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment