‘देवमाणूस’ मालिकेत ‘मंजुळा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

देवमाणूस ही झी मराठी वाहिनीवर सध्या चाललेली मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. कारण त्यातील पात्र आणि त्यांचा नैसर्गिक असा असलेला अभिनय हा खरोखर प्रत्येकाला आपल्या आसपासचा वाटत आहे.

टीआरपीच्या बाबतीत ही मालिका सध्या फार आघाडीवर असते. आज्जी आणि इतर सर्वच पात्र मग डॉक्टर असो किंवा टोण्या हे सर्वच अभिनयाने खूप धमाल करतात.

प्रत्येक एपिसोड हा खूप वेगळा आणि उत्सुकता वाढवणारा आहे. आता या मालिकेत एका नवीन पात्राची भर होणार आहे. त्या पात्राचं नाव काय ? आणि ते कोण साकारत आहे ? पुरुष आहे की स्त्री ? अहो सगळ्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आपल्याला देणार आहोत. थोडं सविस्तर खाली वाचा मग.

See also  "तू तेव्हा तशी" फेम अनामिका माहितेय ना ?.....तिच्या पतीला पाहिलं का....करतो हे काम..

मंजुळा नावाचं नवीन स्त्री पात्र मालिकेत इन होणार आहे, जे की पूर्णपणे खूप वेगळं आहे. मंजुळाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने या आधी मोलकरीण बाई, दिल ढुंढता है यासारख्या मराठी हिंदी मालिकेत काम करताना आपण पहिलच असेल. तिचं खरं नाव आहे, प्रतीक्षा जाधव.

याशिवाय तिने अनेक चित्रपटात ही काम केलेलं आहे. ती तसं पाहिलं तर आघाडीची प्रसिद्ध अशी अभिनेत्री आहे. जिला लहानपणी पासून याक्षेत्राची आवड होती. मोठेपणी यात आता अभिनेत्री म्हणून तिने काम सुरु केलेलं आहे.

मालिकेत तिची एन्ट्री कशी झालीय ? तर मालिकेत नवं पाखरू आलं आहे, जिच्यावर डॉक्टरचा फार जीव अडकलाय. पण ते पाखरू असलेली मंजुळा मात्र डॉक्टरला काही फार असा भाव देत नाही. जाळ्यात ही अडकत नाहीये. तर आता पुढे काय काय होईल याचीच सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.

See also  'कारभारी लयभारी' मालिकेत आलं आहे ध'क्का'दायक वळण, लग्नात पोचतोय बाप? जाणून घ्या काय होणार पुढे...

ही मालिका सातारच्या एका डॉक्टरच्या जीवनावर आधारित आहे. जे आपल्याला माहितच आहे फार काही सांगायला नकोच. तर ही मालिका शूट ही साताऱ्यात चं होत आहे. मालिकेचं लेखन स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम हे लेखक मंडळी करत आहेत.

झी मराठीने वेगळा विषय यावेळी निवडला आहे. ज्याला सुरुवातीला विरोध झाला खूप. पण आता प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment