“तारक मेहता…” मध्ये झाली नवीन पात्राची एंट्री, दयाबेन कि बबिताजींची भूमिका साकारणार ही अभिनेत्री?
टेलिव्हिजनवरील सर्वांचा फेवरेट शो म्हणजे “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा प्रत्येक घरोघरी पाहिला जाणारा सर्वांचा आवडता शो आहे. मागील काही दिवसांपासून या शो मध्ये हंगामा सुरू आहे. या शो मध्ये दयाबेन पुन्हा परत येणार की नाही, याबद्दल काहीच माहित नाही. तर आतापर्यंत सिरीयल मधील पात्र अनेकवेळा बदलली गेली आहेत. या शो मधील महत्त्वाची पात्रे दयाबेन आणि बावरी हे शो सोङून गेले आहेत.
तर दुसरीकडे नटुकाका आणि बबिताजी हे शूटिंग मध्ये नाहीत. अशा परिस्थितीत एक नवी बातमी घङली आली आहे. ते म्हणजे शो मध्ये एका नवीन पात्राची एंट्री झाली आहे. यामध्ये तारक मेहता यांच्या बॉसच्या सेक्रेटरीची भूमिका जोङली आहे. ज्यामुळे शो मध्ये मनोरंजन वाढवता येईल. कारण कमी पात्रांमुळे शो चा TRP खूपच ढासळत होता.
आता या शो मध्ये तारक मेहता ( शैलेश लोढा) हे ऑफिसमध्ये खूप उशीरा येतात. याच कारणामुळे त्यांचे बॉस (राकेश बेदी) हे नाराज होतात. यासोबतच बॉस सोबत सेक्रेटरी दाखविली आहे. सेक्रेटरीची भूमिका अर्शी भारती हिने साकारली आहे. अर्शी भारती हिचा लुक खूपच ग्लॅमरस आहे. जो बबिताजींना नक्कीच टक्कर देऊ शकतो.
अर्शीने सिरीयल मधील सिलेक्शन विषयी म्हटले की, तिने दुसऱ्या कलाकारांप्रमाणेच सिरियलची ऑडिशन दिली. त्यानंतर मग काही दिवसांनी कास्टिंग ङायरेक्टचा फोन आला व त्याने सांगितले की तुमचे नाव शॉट लिस्टमध्ये आले आहे. पहिले तर तिला समजलेच नाही की आपल्याला नक्की कोणत्या भूमिकेसाठी सिलेक्ट केले गेले आहे. तेव्हा कास्टिंग ङायरेक्टरने सांगितले की तुम्हांला “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो साठी सिलेक्ट केले गेले.
अर्शीने म्हटले की, ती आता खूप खुश आहे. कारण तिला हे असे काही होईल, याची मुळीच कल्पना नव्हती. तिने ऑङीशन दिली व ती सिलेक्ट सुद्धा झाली. त्यानंतर तिला कॉलवर शूटिंगसाठी बोलावण्यात आले. परंतु तोपर्यंत तिला विश्वास बसत नव्हता, जोपर्यंत ती शूटिंगसाठी सेटवर आली नाही. तिने जेठालाल, तारक मेहता आणि सोढी यांसोबत काम केले आहे.
अर्शी याआधी कृती सेनन सोबत “पानिपत” या चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिने कृतीच्या फ्रेंडची भूमिका साकारली होती. अर्शी ही मूळची झारखंड मधील जमशेदपूर येथील आहे. ती आपली आई सुनिता भारती सोबत अंधेरी, मुंबई येथे राहते. तिचे वडील राजेश भारती हे एक ज्योतिष पंडीत आहे. ते जमशेदपूर मधील साकची येथे राहतात.
सध्या तर अर्शी भारती हिला तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये घेतले गेले आहे. तर तिच्या फॅन्स च्या मते, ती आपली भूमिका बर्याच काळापर्यंत व्यवस्थित करेल, अशी भावना ते व्यक्त करतात. स्टार मराठीतर्फे अभिनेत्री अर्शी भारती हिला तिच्या नव्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.