भिडे मास्तरांची ‘सोनू’ बिकनीमध्ये झाली फेमस, तुम्ही पाहिला का तिचा हा व्हिडीओ…
टेलिव्हिजनवरील सर्वांचा लोकप्रिय शो “तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील सर्व कलाकार आपले फेवरेट आहेत. या शो मधील बालकलाकार हे आता मोठे झाले आहेत. हे मनोरंजन दुनियेपासून जरी दूर असले तरी आपल्या चाहत्यांची मनं जिंकत आहेत.
टेलिव्हिजनवरील हा एकमेव असा शो आहे, ज्यामधील लहान मुलांना शो मध्ये मोठं होताना सर्व प्रेक्षकांनी पाहिले आहे. अशीच एक बालकलाकार अभिनेत्री निधी भानुशाली म्हणजेच अगोदरची “सोनू” हिला सोशल मीडियावर चाहत्यांचे खूप प्रेम लाभत आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या निधी भानुशालीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या या फोटो आणि व्हिडीओ मध्ये निधी भानुशाली ही समुद्राच्या मध्यभागी सर्फिंग बोर्डावर स्वतःचा तोल सांभाळताना दिसत आहे. वेव्ह सर्फिंग करणे, हे खूप कठीण काम आहे. परंतु निधी मात्र हे अगदी सहजपणे करत असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे निधी च्या लुक विषयी म्हणायचे झाले तर निधी या फोटोमध्ये आपल्या मोकळ्या लांबसडक केसांसह निळ्या आणि काळ्या रंगाच्या बिकनीमध्ये दिसत आहे.
भिडे मास्तरांची ही लाडकी लेक “सोनू” हे पात्र साकारताना घराघरांत पोहोचली. अभिनेत्री निधी भानुशाली हिचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर वायरल होत असतात. सोशल मीडियावर देखील ती खूप एक्टिव असते. स्वतःच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांचे फोटोज् सुद्धा ती चाहत्यांसोबत शेयर करते. अगदी त्याचप्रमाणे निधीचा हा व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर वायरल होत आहे. हा फोटो आणि व्हिडीओ निधीने मार्च मध्ये सोशल मीडियावर शेयर केला होता, ज्याला आजही चाहत्यांची पसंती लाभत आहे.
निधी भानुशाली ने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती. “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेतून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. पुढे 2019 मध्ये आपल्या उच्च शिक्षणासाठी तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता या शो मध्ये सोनू ची भूमिका अभिनेत्री “पलक सिधवानी” ही साकारत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.