“चला हवा येऊ द्या” मधील निलेश साबळेला कसे सुचतात विनोद, स्वतः निलेश साबळेंनीच दिले हे भन्नाट उत्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजन वरील झी मराठी वाहिनीवरील “चला हवा येऊ द्या” हा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध शो आहे. त्यामुळे अभिनेता, विनोदवीर आणि उत्तम सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे हे नाव आपल्या सर्वांच्या ओळखीचे आहे. आपल्या विनोद बुद्धीच्या जोरावर निलेश साबळे यांनी रसिकांच्या मनात आपले एक विशिष्ट स्थान बनवले आहे. एवढेच नव्हे तर या शो ने आपल्या महाराष्ट्राचे नाव अगदी सातासमुद्रापार नेवून ठेवले आहे. सगळ्या चाहत्यांना पडणारा एक प्रश्न म्हणजे निलेश साबळे यांना एवढे भन्नाट विनोद सुचतात तरी कसे बुवा?

तर मित्रांनो याचे उत्तर स्वतः निलेश यांनीच दिले आहे. आपल्या वैद्यकीय शिक्षणासोबत आपल्यातील विनोदाची कला ओळखून ती जोपासत निलेशने कलाविश्वात यशाचे शिखर गाठले आहे. त्याचप्रमाणे एक अभिनेता, एक दिग्दर्शक,मिमिक्री कलाकार, पटकथा लेखक आणि एक उत्कृष्ट सूत्रसंचालक अशा कित्येक भूमिकांमध्ये चाहत्यांनी निलेश साबळे यांना आतापर्यंत पहिले आहे.

See also  1 कोटींची मर्सिडीज ते 3 कोटींची लेम्बोर्गिनी, रणवीर सिंगच्या गॅरेजमध्ये आहे एक से एक गाड्यांचा संग्रह...

“चला हवा येऊ द्या” सोबतच “हे तर काहीच नाय” या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची सगळी जबाबदारी सुद्धा निलेश साबळे हेच सांभाळत आहेत. त्यामुळे या विविध भूमिका ते एकाचवेळी कसे पार पाडतात, हे त्यांनी सांगितले आहे. “नेहमी आजूबाजूला निरीक्षण करत राहणे. म्हणजेच सारखी माणसे पाहत बसणे किंवा नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा शोध घेणे, यामधून आपोआप हे सुचत जाते. निलेश म्हणाले कि,”मी रिक्षात किंवा बसमध्ये बसलो तरीही ते ड्रायविंग कशी करतात किंवा त्यावेळी, त्याठिकाणी काही गंमत घडते का बरं…. हे पाहत राहतो. त्याचप्रमाणे लहानपणापासून मला कॉमेडी माणसे खूप आवडायची.”

पुढे त्यांनी सांगितले की,”शाळेत असताना गॅदरिंगला मी स्वतःच लहानसहान गोष्टी लिहायचो आणि त्या सादर करायचो. त्यानंतर कॉलेजला गेल्यावर सुद्धा माझे विनोदावरील प्रेम हे वाढतच गेले. त्यामुळे दिवसभर डोक्यात विचार चालू असायचे.” अशाप्रकारे डॉ.निलेश साबळे हे नाव आज मराठी इंडस्ट्री मधील खूप लोकप्रिय नाव झाले आहे. म्हणून तर त्यांच्या “”चला हवा येऊ द्या” या शो मध्ये आतापर्यंत अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली आहे.

See also  'या' इवल्याशा गोंडस परीला ओळखलंत का? आज आहे 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment