निलेश साबळे यांनी नारायण राणेंच्या घरी जाऊन मागितली माफी, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“चला हवा येऊ द्या” हा झी मराठी वाहिनीवरील निखळ मनोरंजनाचा तुमचा- आमचा सर्वांचा फेवरेट शो आहे. या आठवड्यात ह्या शो मध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया ङिसूजा देशमुख यांनी हजेरी लावली आहे. आपल्या वेगवेगळ्या मनोरंजक अभिनयामुळे “चला हवा येऊ द्या” च्या सर्व कलाकारांनी अखंड महाराष्ट्राला पोट धरून हसवलं आहे. मात्र यातून अनेकदा कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातात आणि मग शेवटी कलाकारांना त्यांची माफी मागावी लागते.

परंतु या गोष्टींमधून कुणाच्याही भावना दुखावल्या जाण्याची कलाकारांची इच्छा मुळीच नसते. “चला हवा येऊ द्या” या शो चे सूत्रसंचालन ङॉ. निलेश साबळे हे करतात. तर नुकतीच निलेश ने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांची मोठ्या मनाने माफी मागितली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा आपल्याकडून अशी चूक होणार नाही, असे आश्वासन देखील दिले आहे.

See also  देवमाणूस मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये हा अभिनेता साकारणार डॉ. अजितकुमारची भूमिका...

याबाबत नेमकं काय घडलं हा प्रश्न तुम्हांला देखील सतावत असेल. तर मित्रांनो जसे की आपल्याला ठाऊकच आहे की “चला हवा येऊ द्या” ह्या शो मध्ये कित्येकदा राजकीय नेत्यांची पात्र दाखवून त्यातून विनोद केला जातो. “दिवाळी अधिवेशन” हा कार्यक्रम नुकताच चला हवा येऊ द्या मधील ह्या कलाकारांनी सादर केला होता. त्या दरम्यान अगदी हुबेहुब अशी राजकीय नेत्यांची पात्र साकारण्यात आली.

त्यामुळे नारायण राणे यांचे पात्र सुद्धा त्यामध्ये दाखवल्याने त्यांच्या समर्थकांनी ताबडतोब आक्षेप घेतला होता. याविषयी निलेश साबळे ला नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या भावना दुखावल्या गेल्या, असे परखडपणे सुनावले होते. यावेळी त्यांनी आपला राग सुद्धा व्यक्त केला होता. याच कारणामुळे काल 23 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन निलेश साबळे ने माफी मागितली.

See also  अभिनेत्री तेजश्री प्रधान करणार आहे फक्त अश्या मुलाशी लग्न, ज्याच्यामध्ये असतील हे गुण...

यावेळी निलेश साबळे म्हणाला की,”शो च्या दरम्यान अनेक व्यक्तिरेखा साकारल्या जातात. परंतु कुणाच्याही भावना दुखावणे, हा आमचा हेतू नसतो. त्याचप्रमाणे या व्यक्तिरेखा साकारत असताना कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही त्यांची मनापासून माफी मागतो. त्याचप्रमाणे अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतो,” असे आश्वासन सुद्धा दिले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment