बाई वाड्यावर या…असं म्हणणाऱ्या अभिनेते निळूफुले यांनी एका चित्रपटात केला होता या अभिनेत्रीच्या चुंबनाचा प्रयत्न!

.

कलेच्या प्रेमापोटी आसूसलेले अनेक कलावंत होऊन गेले; पण कलेच्या पोटी जन्म घेणारे खुप कमी. त्यातलेच एक आपल्या सर्वांचे लाडके निळूभाऊ फुले. मराठी रंगभूमीवरचा निखळलेला एक अवलिया तारा.

फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीत आपला ठसा त्यांनी उमटवून यशाचं उतुंग शिखर गाठलं. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला हा अस्सल हिरा असणारा अभिनेता माहीत आहे. ते फक्त स्वतःच्या अभिनयाच्या कला कौशल्याच्या जोरावर.

निळकंठ कृष्णाजी फुले हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म २५ जुलै १९३१ मध्ये पुण्यात झाला. पण त्यांची परिस्थिती खुप गरीब होती. त्यामुळे त्यांचं बालपण अत्यंत हलाखीच्या स्थितीत गेलं. अभिनयाची आवड त्यांना लहानपणी पासूनच होती.

मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी एका महाविद्यालयात माळीकाम करायला सुरुवात केली. त्यात ते त्यांचं घर चालवू लागले. सयुंक्त राष्ट्र चळवळीत त्यांनी ” येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे ” हे वगनाट्य लिहिलं. त्यामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

तेव्हापासून त्यांनी पूर्ण वेळ अभिनय नाट्य क्षेत्रात काम करायचं ठरवलं. पुढे गाडी मराठी चित्रपटात आली. सिंहासन सारखे अनेक हिट चित्रपट देऊन हिंदीत गाडी वळली. तिथेही अनेक सुपरस्टार अभिनेत्या सोबत त्यांनी काम केलं.

त्यांचा मराठी मध्ये एक खुप लोकप्रिय झालेला चित्रपट होता. त्यामध्ये त्यांनी खुप अप्रतिम अशी भूमिका साकारली होती. अशोक सराफ आणि त्यांची जोडी त्याकाळी खुप गाजली होती. त्यामध्ये एक सिन आजही खुप व्हायरल होताना पाहत आहोत.

त्या चित्रपटामध्ये निळूभाऊ एका घरी पाहुणे म्हणून जातात. तिथली अविवाहित गृहिणी त्यांना चहा घेऊन येते. त्यांना पाहताच क्षणी खुप आवडते. तेव्हा डोळ्यात काहीतरी गेल्याचं खोटं नाटक करून ते तिला डोळा फुकायला सांगतात.

ती घाबरून तसं करायला लागते. तिला लाज वाटते. पण निळूभाऊ तिचा हात घेऊन तिला जवळ घेतात. तिच्या ओठाचं चुंबन घ्यायला लागताच की तेवढ्यात तिथे अशोक सराफ येतात. त्यामुळे त्यांचा सगळा घोळ होतो.

हा सिन खूपच विनोदी आहे. निळूभाऊ नी केलेला अभिनय तर सोन्याहून सुंदर ये. आजही अनेक तरुण कलाकार यांच्यासाठी ते नेहमी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले.

१३ जुलै २००९ चा दिवस हा मराठी रंगभूमीवरचा खुप डोळ्यात पाणी आणणारा दिवस ठरला. कारण या दिवशी आपले निळूभाऊ आपल्याला सोडुन काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचं व्यक्ती मत्व आणि कर्तृत्व हे खरंच आकाशाएवढं होतं. आज त्यांचा स्मृतिदिन.

त्यांच्या या स्मृतिदिनाच्या दिवशी आठवणींना उजाळा देऊन कला तेवत ठेवण्याचं काम आज अनेक कलाकार करत आहेत. त्यात आमचाही माहिती देऊन असलेला एक प्रयत्न.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment