साऊथ इंडस्ट्रीमधील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री झळकणार लवकरच मराठी चित्रपटात
विजय शिंदे आणि महेश टिळेकर यांचा “हवाहवाई” हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीसाठी येत आहे. या चित्रपटातून “द ग्रेट इंडियन किचन” या सुपरहिट मल्ल्याळम चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री निमिषा सजयन ही लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. “द ग्रेट इंडियन किचन” या चित्रपटातील निमिषा सजयनचा अभिनय आवडल्याने महेश टिळेकर यांनी तिला मराठीत काम करण्याविषयी विचारणा केली. त्याचा निमिषाकङूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
अभिनेता अक्षयकुमार, जयाप्रदा, हेलन या हिंदी कलाकारांनी सुद्धा महेश टिळेकर यांच्या आधीच्या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले होते. त्याचप्रमाणे “बाहुबली” या चित्रपटाचे कॅमेरामन सेन्थील कुमार यांना पहिली संधी महेश टिळेकर यांनी आपल्या “आधार” या चित्रपटाद्वारे दिली होती. “द ग्रेट इंडियन किचन” या चित्रपटासह निमिषा च्या नायटू, मालिक या चित्रपटातील अभिनयाची देखील वाहवा करण्यात आली होती.
स्पेशल विषय आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे मल्ल्याळम चित्रपटांचे देशात तसेच परदेशात सुद्धा प्रचंड प्रेक्षक निर्माण झालेले आहेत. अभिनेत्री निमिषा सजयन हिचा “द ग्रेट इंडियन किचन” हा चित्रपट मराठी प्रेक्षक वर्गाने देखील पाहिलेला आहे. हवाहवाई या चित्रपटात तिला साजेशी अशी भूमिका असल्याने मराठीतील पहिला ब्रेक निमिषाला देण्याचे ठरवले.
साऊथ इंडस्ट्रीमधील चित्रपट हे इतर भाषांमध्ये भाषांतरित होऊन प्रसिद्धीत येत आहेत. त्यामुळे साऊथ मधील उत्तम अभिनय करणार्या कलाकारांना मराठी सिनेसृष्टीत आणण्याचा नवा ट्रेन्ड महेश टिळेकर यांनी आपल्या हवाहवाई या सिनेमातून सुरू केला आहे. निमिषा सजयनसह मराठी इंङस्टीतील काही कलाकारांना देखील या चित्रपटात संधी देण्यात आली आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 88 व्या वर्षी “हवाहवाई” या चित्रपटाचे एक गाणे गायले आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी अधिकाधिक उत्सुकता निर्माण होत आहे. निमिषा सजयन सारखी अप्रतिम अभिनेत्री चक्क मराठी इंङस्टीत पदार्पण करत असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना देखील खूप उत्सुकता लागून राहिली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.