उच्चश्रीमंत असणाऱ्या नीता अंबानी यांची बहीण करते ही साधारण नोकरी, हे ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल.

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या भारतातील सर्वांत उच्चश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना तर अगदी लहानांपासून ते थोरामोठयांपर्यंत सर्वजण ओळखतात. मुकेशजींच्या सुंदर पत्नी नीता अंबानी ह्या तर आपल्या लाईफस्टाइलमुळे नेहमीच लाइमलाइट मध्ये असतात. आपले पती मुकेश अंबानी यांच्यासारख्याच त्या सुद्धा खूप हुशार आहेत. नीता अंबानी ह्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. त्याचप्रमाणे त्या आपल्या इंडियन क्रिकेट टीम आयपीएलच्या मालकीण पण आहेत.

d3082e434c0663f3f630f903f2dd2c15

Advertisement

नीता अंबानी ह्या एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळे त्यांची विचारशैली व जीवनशैली नेहमी चर्चेत असते. ट्रिलियन संपत्तीच्या मालकीण असल्याने त्या सुद्धा खूप फेमस आहेत. त्यांच्या घरापासून ते अगदी एअरपोर्ट पर्यंत फक्त त्यांच्या आलिशान लाइफस्टाइलविषयी ऐकायला मिळते. त्या एवढ्या श्रीमंत आहेत की, अख्खी मुंबई सुद्धा त्या विकत घेऊ शकतात.

See also  मुकेश अंबानी यांच्या यशाची किल्ली आहे खरंतर ही व्यक्ती; अंबानी कुटुंबाशी काय आहे "या" व्यक्तीचा संबंध?

नीता अंबानी ह्या अतिशय ग्लॅमरस आलिशान व श्रीमंतीच्या सुखात जगतात. तर दुसरीकडे त्यांची बहीण ममता दलाल ह्या खूपच साधेपणाचे आयुष्य जगतात. आपले आयुष्य जगण्यासाठी बिचाऱ्या ममता ह्या किती काबाडकष्ट करतात, याची तुम्हांला साधी भनक पण नाही. काय मग मित्रांनो तुम्ही देखील नीता अंबानी यांची बहीण ममता दलाल यांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का?

Advertisement

Mamta Dalal

रविंद्रभाई दलाल आणि पूर्णिमा दलाल यांना नीता दलाल आणि ममता दलाल ह्या दोन मूली आहेत. मुकेश अंबानी यांच्या सोबत लग्न झाल्यावर नीता दलाल ह्या नीता अंबानी झाल्या. तर त्यांची बहीण ममता दलाल ह्या काळातील “धीरुभाई अंबानी” या शाळेत आंतरराष्ट्रीय शिक्षिका म्हणून काम करतात. नीता अंबानी ह्याच या शाळेची संपूर्ण जबाबदारी सांभाळतात. तर ममता दलाल ह्या एक साधारण शिक्षिका म्हणून या शाळेत काम करतात.

See also  बॉलिवूड अभिनेता ‘शाहिद कपूर’ची पत्नी आहे अभिनेत्री पेक्षाही सुंदर
Advertisement

अहो पण तुम्हांला ठाऊक आहे का, या शाळेत बॉलीवुड इंडस्ट्रीमधील किंग खान शाहरुख खान, ऋतिक रोशन, ऐश्वर्या रॉय यांसारख्या दिग्गज सिताऱ्यांची मुले शिकतात. आपल्या एका मुलाखतीमध्ये ममता दलाल यांनी सांगितले होते की, त्यांनी तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मूलीला सुद्धा शिकवले आहे.

nita 2

Advertisement

मात्र या शाळेत सेलिब्रिटीजची मुलं आणि सामान्य मुलं यांच्यात कोणताही भेदभाव केला जात नाही. तसेच त्या म्हणतात की, मला लहान- लहान मुलांना शिकवायला भरपूर आवडते.

कारण त्यांच्यात नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि ते समजून घेण्याची खूप उत्सुकता असते. नीता अंबानी ह्या सतत मीडियाच्या नजरेत अव्वल स्थानी राहतात. तर दुसरीकडे ममता दलाल ह्या मीडियाच्या सावलीपासून सुद्धा लांब राहणे पसंद करतात. त्यांना अतिशय साधे व सरळ आनंदी आयुष्य जगायला आवडते. काही फॅमिली फंक्शन मध्ये ममता दलाल ह्या दिसतात.

See also  ऐश्वर्या रायमुळे पत्रकारांवर चिडल्या होत्या जया बच्चन, म्हणाल्या होत्या, 'ऐश्वर्या काय तुझी...'
Advertisement

nita ambani mamta dalal

या दोन सख्ख्या बहिणींमध्ये एवढा फरक असूनही दोघीही एकमेकींसोबत खूप एकजुटीने राहतात. हे सिक्रेट खूप कमी लोकांना माहीत आहे की, नीता अंबानी ह्या देखील लग्नापूर्वी एक शिक्षिका होत्या. मुकेश अंबानी यांच्यासोबत विवाह झाल्यावर त्यांनी काही दिवस शिक्षिकेची नोकरी केली व त्यानंतर त्या आपल्या पतीच्या बिजनेस मध्ये मदत करू लागल्या.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close