दिलासदायक: ‘या’ भागात वीजबिल वसूल न करण्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांचे आदेश
ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी मोठा निर्णय घेतला असून, पुढील निर्णय होईपर्यंत विजबिलाबाबत कसलीही सक्ती न करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पूरग्रस्त भागात कसलीही विजबिलाची वसूली करू नये असे आदेश ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी दिले आहेत. तसेच राज्यातील ज्या ज्या भागात पुरस्थिती तसेच अतिवृष्टीमुळे वीज कनेक्शन बंद आहे अशा सर्व ठिकाणचे वीज कनेक्शन तातडीने सुरू करा असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पूरग्रस्त भागातील लोकांचे वीजबिल माफी करण्याचे अधिकार मंत्रिमंडळकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मागच्या सरकारने वीज बिल थकीत ठेवले नसते, तर ही वेळ आली नसती…
मागच्या सरकारने 56 हजार कोटीचे वीज बिल थकीत ठेवले, त्यामुळे आम्हाला कर्ज घेण्याची वेळ आली. सध्या लॉकडाऊन मध्ये 24 तास वीज पुरवठा केल्यामुळे आम्ही वीज बिल पूर्ण माफ करू शकत नाही. मी ऊर्जा मंत्री असली तरी वीज बिल माफी करण्याचे अधिकार माझ्याकडे नसून ते अधिकार राज्यमंत्रिमंडळाकडे आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.
पूरग्रस्त भगत वीज बिलही येणार नाही…
नितिन राऊत यांनी सांगितले की, पूरग्रस्त भागात वीज बिल वसूली होणार नाही आणि आम्ही वीज बिलही पाठवणार नाही. सर्व काही ठीक होईपर्यंत आम्ही मदत करत राहू असं आश्वासनही त्यांनी दिलं.
वीज निर्मितीचे अर्थकारण..
सरसकट वीज बिल माफीबद्दल बोलताना त्यांनी वीज पुरवठ्याचे अर्थकारण समजावून सांगितले. वीज काही फुकटात बनत नाही, खाजगी कंपन्यांकडून वीज बिल शासन विकत घेते. त्यांना लागणारा कोळसा पुरवठा देखील आपण करतो. वीज निर्मिती प्रक्रिया खार्चीक आहे. आम्हाला सर्वांचे पगार द्यावे लागतात. त्यामुळे वीज बिल माफ करणं किंवा फुकट वीज देणं शक्य नाही. असं ते म्हणाले.