‘लागिर झालं जी’ फेम नितीश चव्हाणला मिळाली गर्लफ्रेंड? ती आहे तरी कोण?

‘लागीरं झालं जी’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अज्या म्हणजेच नितीश चव्हाण सोशल मिडियावर बराच अ‍ॅक्टीव्ह असतो. लागीरं झालं जीनंतर त्याचा मेक ओव्हर त्याच्या फॅन्सनाही आवडला आहे. नितीश आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. हे कारण म्हणजे त्याचे सोशल मिडियावरील व्हिडियोज. या व्हिडियोमध्ये नितीश सोबत एक मुलगी झळकत आहे. या मुलीला पाहून ही नितीशची गर्लफ्रेंड तर नाही ना असे प्रश्न त्याचे फॅन्स विचारत आहेत.

छोट्या पडद्यावरची ‘लागिरं झालं जी’ या मालिकेनं निरोप घेऊन अनेक महिने झाले असले तरी या मालिकेतील कलाकारांची क्रेझ कमी होताना दिसत नाहीए. मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी शिवानी बावकर असो किंवा मग भय्यासाहेब सर्वांचाच चाहता वर्ग मोठा आहे. त्याहूनही खास गोष्ट म्हणजे मालिकेत मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता नितीश चव्हाण हा देखील प्रेक्षकांमध्ये तितकाच प्रसिद्ध आहे.

नितीश चव्हाणला टिकटॉकची प्रचंड क्रेझ असून त्याचे टिकटॉकवर देखील हजारो फॉलोअर्स आहेत. तो वरचेवर अनेक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या टिकटॉक व्हिडिओमुळं त्याची चर्चा सुरू असून या व्हिडिओत नितीशसोबत एक तरुणी असते. त्यामुळं ही तरुणी नक्की कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सोशल मीडियावरील त्याच्या प्रत्येक अपडेट त्याचे चाहत्यांसह तो शेअर करतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ तर तुफान व्हायरल होत असतात. मात्र या सगळ्यात त्याने शेअर केलेला एक फोटोने सा-यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत तो एका तरूणीसह दिसत आहे. आता नेमकी नितीश बरोबर असलेली तरूणी आहे तरी कोण? तो प्रेमात तर नाही ना? त्याने त्याच्या प्रेमाची दिलेली ही कबुली तर नाही ना? असे अनेक प्रश्न चाहते विचारताना दिसतायेत. फोटोत दिसणारी सुंदर तरूणीचे नाव आहे श्वेता खरात. श्वेता सध्या ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत झळकत आहे.

नितीशसोबतच्या व्हिडियोमधील ही मुलगी आहे श्वेता खरात. श्वेताला प्रेक्षक ओळखतात ते ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील मोनी म्हणून. या मालिकेत मोनीच्या व्यक्तिरेखेतील श्वेताने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. आता नितीशच्या मनात तिचं काय स्थान आहे हे देखील लवकर कळेल.

नितीश चव्हाण आणि श्वेता खरात हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. मोकळ्या वेळात दोघे फिरायला जातात त्यामुळं श्वेता आणि नितीशचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असून चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु असल्याचे बोलले जात आहे. यावर अजूनतरी नितीशने मौनच राखले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment