या कारणामुळे कोणतीही अभिनेत्री करू इच्छित नव्हती ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील निशाची भूमिका!
जर आपण बॉलिवूडच्या सर्वात दिग्गज आणि प्रसिद्ध दिग्दर्शकाबद्दल बोललो तर यश चोप्रा यांचे नाव या यादीमध्ये प्रथम येते. ज्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक शानदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. यश चोप्रा असे दिग्दर्शक होते ज्यांच्याबरोबर काम करण्यासाठी प्रत्येक कलाकार आतुर होता ता. यश चोप्राबरोबर काम करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा होती.
पण एका चित्रपटासाठी यश चोप्राला अभिनेत्री निवडण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागले. तो म्हणजे 1997 मध्ये रिलीज झालेला दिल तो पागल हा चित्रपट. ज्यामध्ये करिश्मा कपूरने साकारलेल्या दुसर्या लीड अभिनेत्री म्हणजेच निशाच्या भूमिकेसाठी त्यांना कोणतीही अभिनेत्री मिळत नव्हती.
याचे कारण माधुरी दीक्षित होते. ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील निशाच्या भूमिकेसाठी यश चोप्राने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना ऑफर दिली होती पण प्रत्येक अभिनेत्रीने या भूमिकेस नकार दिला. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, जेव्हा यश चोप्रा करिश्मा कपूर यांच्याकडे निशाच्या भूमिकेसाठी गेले होते, तेव्हा त्यांनी चित्रपट करण्यास नकार दिला होता. तर करिश्मा कपूर यश यांची पहिली पसंती होती, तिच्या नकारानंतर त्यांनी जूही चावलाला चित्रपटाची ऑफर दिली तिने हि ती नाकारली.
कारण हा तो काळ होता जेव्हा जुही आणि माधुरी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री होत्या. अशा परिस्थितीत जुहीला माधुरीकडून सेकेंड लीड घ्यायची नव्हती. याशिवाय यश याना मनीषा कोईराला घेण्याची इच्छा होती. पण तिनेही नकार दिला. यानंतर, काजोल आणि रवीना टंडन यांनाही या भूमिकेसाठी ऑफर करण्यात आले होते पण माधुरीबरोबर दुसरे लीड अभिनेत्री साकारण्यासाठी कोणीही तयार नव्हते.
अशा परिस्थितीत यश चोप्रा पुन्हा एकदा करिश्मा कपूर यांच्याकडे गेले आणि त्यांना समजावून सांगितले. यानंतर करिश्मा तयार झाली आणि तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आणि हे पात्र तिच्या खास व्यक्तिरेखेप्रमाणे संस्मरणीयही बनले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.