देशांतर्गत प्रवास: ‘या’ राज्यांत जाण्यासाठी तुम्हाला RT-PCR करण्याची आवश्यकता नाही, पण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

देशात कोरोनाचा प्रकोप कमी झाला आहे का ? ज्या पद्धतीने अनेक राज्य निर्बंध शिथिल करत आहेत त्यावरून तर हेच वाटत आहे. देशात अजूनही दरोज 30 हजारपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. काही राज्यात परिस्थिती पुन्हा गंभीर बनत आहे. दरम्यान, अनेक राज्यांनी परराज्यातून येणार्‍या लोकांसाठी RT-PCR चाचणी करण्याची अट घातलेली होती. मात्र आता बर्‍याच राज्यांनी ही अट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तर जाणून घेऊया कोणकोणत्या राज्यांत जाण्यासाठी कोरोना चाचणी करणे आवश्यक नाही.

अनेक राज्यात विमानवाहतुकीचे नियम अतिशय कडक आहेत. पण आता परिस्थिती वेगाने बदलत असल्याचे दिसते. सध्या देशात किमान सात राज्ये आहेत जी आता प्रवाशांसाठी पूर्णपणे उघडली आहेत. या राज्यांत उड्डाणांसाठी कोणतीही चाचणी अनिवार्य असणार नाही. दुसरीकडे, काही राज्यात लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरच प्रवेश मिळेल. सध्या देशांतर्गत प्रवासासाठीचे नियम सतत बदलत आहेत.

See also  एक साधा कार्यकर्ता ते थेट आमदारकीपर्यंत मजल मारणारे अमोल मिटकरी यांचा संघर्ष !

या राज्यात विना-चाचणी प्रवास करता येईल..

सध्या देशात मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पंजाब, हरियाणा या राज्यात जाण्यासाठी कुठल्याही चाचणीची गरज नाही. मात्र, या राज्यात कोरोना संसर्गात पुन्हा वाढ दिसू लागली तरी प्रवाश्यांची चाचणी करण्यात येऊ शकते.

बाकीच्या राज्यात एक लस घेतलेल्या व्यक्तींना प्रवेश आहे. मात्र, त्यांना 7 दिवस विलगीकरणात राहावे लागेल. तसेच कर्नाटकात जायचे असेल तर महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील नागरिकांना कोविड निगेटिव अहवाल सोबत ठेवावा लागत आहे.

सध्या गरज असेल तरच प्रवास करा अन्यथा करू नका असे शासन वारंवार सांगत असून, तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वांना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment