दिलासा: राज्यातील नवीन रुग्णांची संख्या घटली, आढळले फक्त ‘एवढे’ रुग्ण

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: देशात एप्रिल पासून धुडगूस घालणारी कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र महाराष्ट्रातील परिस्थिती थोडी वेगळी होती. राज्यात मागील काही दिवसांपासून रोज 9 हजारच्या आसपास नवीन कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र, सोमवारी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी नवीन कोरोना रुग्णात लक्षणीय घट झालेली पाहायला मिळाली. सोमवारी संपलेल्या 24 तासात 7,603 नव्या रुग्णांची नोंद झाली. ही माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील सोमवारी 15,277 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यासोबतच राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 59,27,756 वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के झाले आहे. तरी चिंतेची बाब म्हणजे आजही राज्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णाची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. सध्या 1,08,343 रुग्ण उपचाराधीन आहेत.

See also  'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा साखरपुडा सोहळा संपन्न, पाहा फोटोज्

मुंबईतील कोरोना संसर्गाची परिस्थिती

मुंबई मध्ये सोमवारी 478 रुग्ण सापडले आहेत. तसेच 701 रुग्ण बरे झाले आहेत. यासोबतच मुंबईतील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7,03,077 झाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96 टक्के आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7,120 आहे.

पुणे शहरातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. काल पुण्यात 189 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच दिवसभरात 279 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

See also  राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर कमी, पण निर्बंधात सूट मिळेल की नाही? वाचा आरोग्यमंत्री काय म्हणाले...
Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment