अरे देवा..! विक्की आणि कतरिना यांच्या लग्नाआधीच जयपूरमध्ये पडू लागला या गोष्टीचा मोठा तुटवडा
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अप्रतिम सौंदर्याची अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांच्या लग्नाला काही दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे सगळ्यांची लगबग सध्या सुरू आहे. तरी लग्नाची फायनल तारीख अजूनपर्यंत काही निश्चित झालेली नाही.
परंतु या लग्नासंबंधित लहानसहान अडचणी आता ङोकं वर काढू लागल्या आहेत. या कपलचे लग्न राजस्थान मधील जयपूर मध्ये मोठ्या थाटामाटात होणार आहे. ङिसेंबर महिन्यातील 7 ते 9 या तारखेदरम्यान हा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या जयपूर मध्ये मोठी जय्यत तयारी सुरू आहे.
अनेक सुप्रसिद्ध सेलिब्रिटींना लग्नाचे आमंत्रण देखील पोहोचले. कोरोना काळाचे भान ठेवत आणि सर्व नियमांचे काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी करत कतरिना व विक्की यांचा हा शाही विवाह पार पडणार आहे. या कपलला लग्नात कोणत्या गोष्टीची कमी भासू नये, म्हणून जोरात तयारी सुरू आहे. या दोघांचेही मॅनेजर आधीच जयपूर ला पोहोचले आहेत.
तुम्हांला ठाऊक आहे का, या लग्नाच्या तयारीमुळे जयपूर मध्ये एका गोष्टीचा तुटवडा जाणवू लागला. तसेच नोव्हेंबर- ङिसेंबर मध्ये पर्यटकांची राजस्थानमध्ये भरपूर गर्दी सुद्धा असते. त्यामुळे यंदा राजस्थान मध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना खूप मोठा फटका बसणार आहे, हे नक्की आहे. जयपूर मध्ये असलेल्या कार रेंटल सर्व्हिसकङून मोठमोठ्या ब्रँडेड कार आधीच बुक करण्यात आल्या आहेत. एकाचवेळी या सर्व कारसेवा बुक झाल्याने आता पर्यटकांना मात्र कार उपलब्ध करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एवढंच नव्हे तर लवकरच भाड्याच्या घरात या कपलचा संसार सुरू होणार आहे. मुंबईतील जुहू येथील प्लॅट त्यांनी लग्नाआधीच बुक करून भाड्याने घेतल्याचे समजते. ज्या बिल्डिंग मध्ये विक्की आणि कतरिना यांनी प्लॅट घेतला आहे. त्याच बिल्डिंग मध्ये विराट आणि अनुष्का शर्मा हे देखील राहतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.