मराठी मातीतील सुवर्णपदक विजेती युवा कुस्तीपटू सोनालीला या तरुण राजकीय नेत्याने दिला मदतीचा हात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील एक छोटेसे गाव कापरेवाडी. या गावामध्ये उदयोन्मुख कुस्तीपटू सोनाली कोंडीबा मंडलिक हिचे झोपडीवजा पत्र्याचे घर आहे. या सोनालीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्ती क्रीडाप्रकारात २ वेळा सुवर्ण पदक मिळवले आहे. तसेच इतर अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्येही तिने अनेक पदके मिळवली आहेत.

सध्या सोनालीच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती ही खूपच हालाखीची असल्याने तिचा घरीच तयार केलेल्या झोपडीच्या तालमीत सराव सुरू आहे. तिच्या कुस्तीच्या सरावासाठी तिच्या घरचे चक्क स्वतः गोठ्यात राहात आहेत. आणि अशा अत्यंत खडतर परिस्थितीत तिने कुस्ती या मर्दानी खेळात एक नव्हे तर दोनदा सुवर्णपदक पटकावले आहे. या बद्दलची माहिती तरुण आमदार रोहित पवार यांना समजताच, त्यांनी सोनालीची माहिती घेऊन तिच्या कुस्तीमधील पुढील प्रशिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारली.

See also  "शर्लिन चोप्राने राज कुंद्राची देव्हाऱ्यात फोटो ठेवून पूजा करावी" या अभिनेत्रीच धक्कादायक वक्तव्य...

या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे की, “सोनालीने खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचा मला अभिमान आहे. तिच्याशी, तिचे पालक आणि वस्ताद यांच्याशी माझे बोलणेही झाले. या भगिनीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. यशाची अशी अनेक शिखरं ती सर करेल, असा मला विश्वास आहे, असे रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. रोहित पवार यांच्या या स्तुत्य निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, सोनाली सध्या कर्जतच्या महाविद्यालयाच १२ वीचे शिक्षण घेत आहे. तिला आर्थिक पाठबळ मिळाले तर तिच्या स्वप्नांना नक्कीच भरारी मिळेल आणि ती भारताचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास व्यक्त करत तिला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच, सोनालीने कुस्ती क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा आहे. यासाठी तिला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वतःसाठी घर नसतानाही गोठ्यात राहून तिच्या खेळाची तयारी करून घेत आहेत.

See also  अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या फोटोवर शाहीद कपूरच्या भावाची कमेंट, पहा नेटकरी काय म्हणतायत...

सोनालीने कुस्ती क्रीडाप्रकारात असेच यश मिळवावे. कुटुंबीयांच्या हालाखीच्या परिस्थितीचे कोणतेही दडपण न घेता तिने आता फक्त कुस्तीच्या सारावावर लक्ष केंद्रित करून यशस्वी व्हावे. या निमित्ताने महाराष्ट्रातुन एक ताकदीची महिला कुस्तीगीर तयार व्हावी म्हणून आमदार रोहित पवार यांनी सोनालीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या साठी या तरुण नेत्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  गावातल्या सर्वसामान्य कुटूंबात जन्म झालेले "नसिरुद्दीन शाह" असे झाले सुपरस्टार अभिनेते...

Leave a Comment