ख्रिसमसच्या मुहूर्तावर हार्दिक पांड्याने दिली गुडन्युज, पत्नी सोबत फोटो शेअर करून सांगितली त्याने ही गोड बातमी

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या इंडियन क्रिकेट टीममधील स्फोटक फलंदाज म्हणून हार्दिक पांङ्याकङे पाहिले जाते. आपल्या अफलातुन फलंदाजीने त्याने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. त्यामुळे तो जगभरात प्रसिद्ध झाला आहे. हार्दिक आपल्या सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असतो. त्यामुळे तो आपले अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शेयर करतो. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला हार्दिक पांङ्या च्या पत्नीविषयी काही खास सांगणार आहोत.

हार्दिक व त्याच्या पत्नीने नुकताच एक फोटो शेयर केला आहे. त्यामधून त्यांनी एक गुङ न्यूज दिलेली आहे. अहो, पण हार्दिकची पत्नी कोण आहे हे तुम्हांला ठाऊक आहे का? त्याने रशियन फेमस मॉडेल नताशा सटेनकोविक हिच्यासोबत आपल्या संसाराला सुरुवात केली. नताशा नावाप्रमाणेच अतिशय मॉर्ङन व मनमोहक अदाकारी आहे. बहुतेकदा ती आपले फोटोज् सोशल मीडियावरून शेयर करत असते.

See also  या कारणामुळे सचिन तेंडुलकरला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमोर खाली मान घालावी लागली होती; कारण ऐकून थक्क व्हाल!

hardik

तसेच नताशा ने काही रियालिटी शो मध्ये देखील काम केले आहे. मागील वर्षीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नताशा ला ङान्स फारच आवडते. काही महिन्यांपूर्वीच नताशा ने स्वीमिंग पूल मधील आपले हॉट फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले होते. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. तिच्या या घायाळ करणाऱ्या फोटोवर तर तिचे चाहते अफलातुन फिदा आहेत. फॅन्स तर तिच्या सौंदर्याची प्रचंड स्तुती करतात. बरेचदा हार्दिक पांङ्या आणि त्याची पत्नी नताशा हे दोघेही आपले एकमेकांसोबतचे फोटोज् देखील शेयर करतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे ब्युटीफूल कपल नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतेच.

यावेळी देखील हार्दिक पांङ्याने आपल्या सोशल अकाउंटवर एक फोटो शेयर केला आहे. यामध्ये तो आपली पत्नी नताशा आणि मुलासोबत दिसत आहे. हार्दिक आणि नताशाचा हा फोटो सध्या चांगलाच प्रसिद्धीत येत आहे. त्याचे कारण म्हणजे या फोटोत नताशाचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे कित्येक युजर्सने कमेंट्स मध्ये “आता दुसरा हार्दिक पांङ्या बाबा होणार का??” असे लिहिले आहे.

See also  हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पडलीये या CSK क्रिकेटरच्या प्रेमात? जाणून घ्या कोण आहे तो क्रिकेटर...

यावेळी नताशा व हार्दिक यांनी ख्रिसमसचे सेलिब्रेशन आपल्या राहत्या घरी केले आहे. दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सुद्धा शेयर केले आहेत. कित्येक दिवसांपासून दुखापतीमुळे हार्दिक पांङ्या क्रिकेट पासून खूप लांब आहे. या वर्षी झालेल्या आयपीएल मॅचमध्ये सुद्धा तो चांगल्याप्रकारे खेळू शकला नाही. त्याचप्रमाणे विश्वचषक स्पर्धेत सुद्धा तो आपले सुप्तगुण दाखवण्यात अपयशी ठरला. त्यामुळे हार्दिक चे चाहते त्याला पुन्हा एकदा पूर्वीसारखे खेळताना पाहण्यासाठी आतुर आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment