जेव्हा हनिमूनच्या रात्री शाहरुख खान गौरीला एकटे सोडून हेमा मालिनीकडे गेला होता…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवूड इंडस्ट्रीत जेव्हा जेव्हा पॉवर कपलची चर्चा होते तेव्हा इंडस्ट्रीचा ‘किंग खान’ अर्थात शाहरुख खान आणि त्याची लाडकी पत्नी गौरी खान यांचे नाव घेतले जाते. या दोघांनीही आपल्या क्यूट अशा लव्ह केमिस्ट्रीने लाखो जोडप्यांना प्रेरित केले आहे. शाहरुख आणि गौरी 25 ऑक्टोबर 1991 रोजी विवाहबंधनात अडकले होते. पण गौरी खानला आपली बायको बनवण्यासाठी शाहरुख खानला खूप मेहनत करावी लागली होती हेही खरे आहे.

शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या प्रेमकथेशी संबंधित अनेक किस्से बॉलिवूडमध्ये ऐकायला मिळतात.  दोघांच्या पहिल्या भेटीपासून ते त्यांचे तीनदा लग्न होईपर्यंत चाहत्यांनी या जोडप्याशी संबंधित सर्व किस्से वाचले आहेत. पण शाहरुख आणि गौरी खानच्या हनीमूनशी संबंधित गोष्ट तुम्हाला क्वचितच माहीत असेल. अभिनेत्री हेमा मालिनीमुळे दोघांची पहिली रात्र उध्वस्त झाली होती आणि खुद्द शाहरुख खाननेही एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

See also  राखी सावंतचा विचित्र ड्रेस पाहून तिच्या अंगावर धावून गेला कुत्रा, त्यानंतर जे घडले...

शाहरुख खानने गौरीशी लग्न केल्यानंतरच बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. आणि या दरम्यानच हा अभिनेता ‘दिल आशना है’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. याच कारणामुळे लग्नानंतर लगेचच तो पत्नी गौरीसोबत मुंबईत आला. यादरम्यान शाहरुख खानकडे राहण्यासाठी घर नसल्याने तो गौरीसोबत हॉटेलमध्ये राहायला गेला होता. येथे अभिनेता अजीज मिर्झाने शाहरुख आणि गौरीसाठी एक रूम बुक केली होती.

त्यावेळी हेमा मालिनी या ‘दिल आशना है’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका होत्या. गौरीसोबत हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर शाहरुख खानने सर्वप्रथम हेमा मालिनी यांना फोन केला होता. यादरम्यान शाहरूख खान याने हेमा मालिनी ला सांगितले होते की मी मुंबईला परतलो आहे. आणि त्यांनतर हेमा मालिनी ला शाहरुख मुंबई ला आल्याचे कळताच तिने शाहरुखला भेटण्यासाठी सेटवर बोलावले आणि शाहरुखही हेमा मालिनी यांना नाही म्हणू शकला नाही.

See also  "तारक मेहता..." मालिकेतील पोपटलालचे झाले लग्न, पोपटलालची प्रेमकहाणी ऐकून थक्क व्हाल!

याच कारणामुळे शाहरुख खानला हनीमून सोडून हेमा मालिनी यांना भेटायला जावे लागले. यादरम्यान शाहरुखने गौरीलाही सेटवर सोबत नेले. मात्र त्यावेळी हेमा मालिनी सेटवर उपस्थित न्हवत्या. अशा स्थितीत शाहरुख खानने गौरीला मेकअप रूममध्ये बसवले आणि स्वत: शूट करायला गेला. दोघेही रात्री 11 च्या सुमारास सेटवर पोहोचले आणि 2 वाजता शाहरुख शूट करण्यासाठी गेला.

असे म्हटले जाते की गौरी येथे साडी, वजनदार दागिने आणि बांगड्या घालून आली होती आणि ज्या खोलीत गौरी बसली होती त्या खोलीत अनेक डास होते, जे गौरीला चावले आणि त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. हे सर्व पाहून शाहरुख खान भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले.

एका मुलाखतीत या संपूर्ण घटनेची आठवण करून देत शाहरुख खान म्हणाला होता, ‘त्या दिवशी माझ्या निर्णयावर मी खूप रडलो. मला तो दिवस माझ्या आणि गौरीसाठी अपमानास्पद वाटला. डासांनी भरलेल्या निकृष्ट खोलीत माझी वाट पाहतच गौरीचा हनिमून झाला होता. या मुलाखतीत शाहरुखने असेही सांगितले की, मी शूटिंग पूर्ण करून आलो तेव्हा गौरी मला काहीच बोलली नाही.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment