“आई कुठे काय करते” मधील अरुंधतीच्या आयुष्यात होणार ‘या’ अभिनेत्याची एंट्री, पाहा कोण असेल तिचा हा नवा मित्र…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरील अफलातुन प्रसिद्धीत असलेली मालिका “आई कुठे काय करते”. या मालिकेने अत्यंत कमी कालावधीतच मोठ्या प्रमाणात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. उत्कृष्ट कथा आणि उत्तम अभिनय असल्याने ही मालिका दिवसेंदिवस प्रसिद्धीचा उच्चांक गाठत आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात संजना मध्ये आल्याने त्यांच्यात दु’रावा निर्माण झाला. परिणामी, हे वैवाहिक जोडपे एकमेकांपासून वि’भ’क्त झाले.

तर आता दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध हे एकमेकांसोबत सुखी संसार करत असून अरुंधती बिचारी एकटी प’ड’ली आहे. परंतु आता मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, आता लवकरच मालिकेत अरुंधती च्या आयुष्यात तिच्या जुन्या मित्राची एन्ट्री होणार आहे. मागील काही दिवसांपासून ही भूमिका अभिनेता समीर धर्माधिकारी हा निभावणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र आता ही भूमिका नेमकं कोण साकारणार, हे समोर आलेले आहे.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा उरकला नुकताच साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री...

नुकताच एक व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये अरुंधती च्या आयुष्यात येणारा नवा मित्र दिसत असून ही भूमिका समीर धर्माधिकारी साकारणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या मालिकेतील ही भूमिका सावित्री ज्योती या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेता साकारणार असल्याचे दिसते.

“आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधती च्या मित्राची म्हणजेच आशुतोष केळकर ची एन्ट्री होणार आहे. आशुतोष हा अरुंधतीचा लहानपणीचा जवळचा मित्र असून त्याच्या सोबत तिची चांगलीच ध’म्माल के’मि’स्ट्री बनणार आहे. सुरुवातीला या भूमिकेसाठी समीर धर्माधिकारी या नावाची चर्चा होत होती. तर आता या भूमिकेत ओंकार गोवर्धन दिसणार असल्याचे समजते.

आशुतोष आणि अरुंधती हे तब्बल 26 वर्षांनंतर एकमेकांना भेटणार आहेत. त्यामुळे यांची मैत्री पाहिल्यावर देशमुख कुटुंबाची आणि विशेषतः संजना व अनिरुद्ध यांची प्रतिक्रिया काय असेल, हे खूपच महत्त्वाचे ठरेल.

See also  या कारणांमुळे "येऊ कशी तशी मी नांदायला" या मालिकेतील कलाकार सेटवर झाले भावुक, हि अभिनेत्री तर रडत...

यादरम्यान आशुतोष केळकर ची भूमिका ओंकार गोवर्धन साकारणार. तर ओंकार हा मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने कित्येक मालिका व चित्रपटांत काम केले आहे. हल्लीच त्याची सावित्री ज्योती ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment