ऑनलाइन मैत्री ठरू शकते धोकादायक; बर्थडे पार्टीसाठी 5 स्टार हॉटेल मध्ये बोलावून महिलेसोबत केले असे काही, ऐकून धक्का बसेल
मुंबई: सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेकजण या आभासी जगातील नवनवीन लोकांशी ओळख निर्माण करून मित्र बनतात. पण बर्याच वेळी ही ऑनलाइन मैत्री अंगलट येऊ शकते. ऑनलाइन फसवणूक आणि इतर गुन्हे होण्याची शक्यत फार जास्त असते.
अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईमध्ये एका 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवून एका महिलेवर बलात्कार झाल्याचे उघड झाले. पीडित महिलेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरोपीने तिला बोलावले. दरम्याम महिलेच्या पेयात गुंगीचे औषध टाकण्यात आले. त्यानंर तिच्यावर त्याच हॉटेलच्या रूममध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिला आणि आरोपीची सोशल मीडियावर ओळख झाल्याची माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव अविन अग्रवाल असून, त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी अविन अग्रवाल याच्यावर कलम 328 आणि 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकी कशी घडली घटना?
आरोपी अविन अग्रवाल आणि पीडित महिलेची सोशल मीडियावर ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले. आरोपीने पीडितेला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले होते. मात्र संबंधित हॉटेल मध्ये बोलावून तिच्या ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध मिसळण्यात आले. ड्रिंक घेतल्यानंतर काही वेळात ती बेशुद्ध झाली. नंतर शुद्धीवर आल्यावर ती रूममध्ये एकटीच होती. घाबरलेल्या अवस्थेत तिने घरी फोन करून या घटनेची माहिती दिली. कुटुंबियांनी डॉक्टर आणि पोलिसांना या संदर्भात माहिती देत घटनास्थळी जाऊन पीडितेला घरी आणले. आता याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.