पंढरपूरला जाणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी केला टीकांचा वर्षाव, वाचा कोण काय म्हणाले?
मुंबई: महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांचा रडारवर आहेत. या ना त्या कारणावरून विरोधक नेहमीच उद्धव ठाकरेंना धारेवर धरतात. अशातच आषाढी एकादशी विठ्ठलाच्या महापूजेनिमित्त मुख्यमंत्री पंढरपूरला रवाना झाले. विशेष म्हणजे मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी ते स्वतः गाडी चालवत पंढरपूरला गेले आहेत. यावर भाजपासह अन्य विरोधीपक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केलीय.
उठा उठा आषाढी आली…
रयत क्रांति संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला मारला आहे. उठा उठा आषाढी आली, ‘स्वबळावर’ गाडी चालत पंढरीला जायची वेळ आली, अशा खोचक शब्दात टीका केली. सदाभाऊ खोत यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
या मुख्यमंत्र्याला विठ्ठलही माफ करणार नाही…
नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “जो माणूस महाराष्ट्र हातात येऊनही चालू शकला नाही तो माणूस मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही. कारण इतक्या सहजपणे महाराष्ट्र राज्याची वाट लावणार्या व्यक्तीला माफी नाही.”
वारकरी भक्तांना बसवूनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी व्यंगात्मक अभंगाद्वारे मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले, ‘जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…’
जनतेचे जिणे हराम
मुख्यमंत्र्यांचे घरातून कामपावसाने मुंबईचा चक्का जाम
मुख्यमंत्र्यांचे घरातूनच कामएमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम
तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच कामतुका म्हणे माझा
विठ्ठल झाकोळला…
वारकरी भक्तांना
बसवुनी घरी,
फोटोमध्ये झळकती
मुख्यमंत्री…— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 19, 2021
मुख्यमंत्र्यांवर होणार्या टीकेबाबत तुमचे काय मत आहे? आम्हाला तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल. तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्स मध्ये कळवा!