4 कोटींचा हुंडा नाकारून फक्त 1 रुपया घेऊन लग्न केले या नवरदेवाने, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

“घर बांधावे बांधून आणि लग्न पाहावे करून” असे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणतात. ते काही उगाच नाही. खरं तर ‘लग्न’ समारंभासाठी अफाट खर्च आपल्या देशात केला जातो. मुलीच्या साजशृंगारापासून ते तिला घरातील सर्व आवश्यक वस्तू या भेट स्वरूपात मुलीच्या घरच्यांनी देणे, ही एक रीत आहे. पण त्यात आणखी एक भर म्हणजे ‘हुं’डा’.

मूलीचे वडील श्रीमंत असो किंवा गरीब, आपल्या मूलीला परघरी देताना तिच्या सासरच्या मंडळींना लाखो- करोडो रुपयांचा ऐवज ‘हुं’डा’ स्वरूपात दिला जातो.
थोडक्यात हा हुंडा म्हणजेच मुलीच्या आई- वडिलांच्या ग’ळ’याचा फा’स असतो. आपली कुवत नसतानाही कर्जबाजारी होऊन फक्त आणि फक्त आपल्या काळजाच्या तुकड्याच्या आनंदी आयुष्यासाठी मूलीचे वडील हुंडा देण्यास तयार होतात.

आपण आजही ऐकतो, सासरच्या लोकांनी मूलीचा छ’ळ केला, तिला जाळले- पोळले अशा कित्येक हुंडाबळी गोष्ट आपल्या कानावर येतात. आपल्या समाजाला लागलेली ही एक प्रकारची की’ङ आहे आणि हीच स’मा’ज पोखरणारी कीङ मूळापासून नष्ट करणे, हे आपल्या तरुण पिढीसमोर एक खूप मोठे आव्हान आहे.

मित्रांनो आम्ही आज तुम्हांला ‘ए’का’ ‘ल’ग्ना’ची’ ‘गो’ष्ट’ सांगणार आहोत. ज्या लग्नात स्वतः नवऱ्या मुलाने एक योग्य आदर्श निर्माण केला आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात होत आहे.

हरियाणा राज्यातील आदमपुर येथील नुकत्याच झालेल्या या लग्न सोहळ्याने संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणा निर्माण केली आहे. या नवऱ्या मुलाचे बलेंद्र असे आहे. याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. का माहित आहे, कारण बलेंद्रने लग्नाच्या आधी मुलीच्या परिवारासमोर एक शर्त ठेवली होती.

“मी आपल्या मूलीसोबत लग्न करणार परंतु हे लग्न अतिशय साधेपणाने होईल तसेच तुम्ही कोणत्याही प्रकारचा हुंडा देणार नाही आणि मी स्वीकारणार नाही. तुमची मुलगी हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे या अनमोल संपत्तीसोबत मला आणखी कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही.” बलेंद्रचे हे शब्द ऐकताच मुलीच्या आई- वङीलांचे ङोळे पाणावले. तसेच आपल्या मूलीसाठी योग्य वर मिळाल्याचे समाधान देखील त्यांना मिळाले.

या विशिष्ट आदर्शवादी लग्नात नवरा मुलगा हा आपल्या परिवारातील काही जवळच्या नातेवाईकांसह उपस्थित होता. कोणताही ङिजे किंवा कोणताही वरातीचा वायफळ खर्च बलेंद्रने लग्नात केला नाही. मुलीच्या घरचे 4 करोड रक्कम हुंडा म्हणून देत असतानाही या मुलाने केवळ 1 रु. आणि नारळ स्वीकारून मुलीसोबत लग्न केले.

खरंच किती छान विचार आहेत या मुलाचे..ज्याने एक आदर्शवादी समाज बनवण्याची स्वतःपासून सुरुवात केली. समाजातील या घृणास्पद रुढी- परंपरांचा नाश करणे, ही तर खरी काळाची गरज आहे. जेव्हा समाज सुधारेल, तेव्हाच तर देशात देखील आमूलाग्र बदल होतील.

आमचा हा लेख वाचणाऱ्या प्रत्येक मित्रांनी बलेंद्रसारखे उच्चतम विचार ठेवा आणि पुढील पिढीला सुदृढ व सुशिक्षित बनवण्याची मोहीम हाती घ्या. मुलीच्या लग्नापेक्षा तिच्या शिक्षणावर खर्च करा. कारण एक सुशिक्षित मूलगी ही आपली एक संपूर्ण पिढी सुशिक्षित आणि समृद्ध बनवते, हे लक्षात ठेवा.

आमच्या प्रिय मित्र- मैत्रीणींनो, तुम्हांला आमचा हा लेख कसा वाटला बरं, हे आम्हांला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. त्याचप्रमाणे मनोरंजन ट्विस्ट आणि नवनवीन घटनांचा गरम मसाला असलेले लेख आम्ही नेहमी आपल्यासाठी लिहित आहोत. तर मग हा सर्व मनोरंजन खजिना मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला देखील अवश्य लाईक करा.

Leave a Comment