ही पाकिस्तानी अभिनेत्री करतेय बॉलिवूड मध्ये पदार्पण.. जाणून घ्या कारण आणि त्या अभिनेत्रीचं नाव…

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये राजकियदृष्ट्या तणाव असला तरी चित्रपट उद्योग मात्र त्याला अपवाद आहे. आज पाहतो की भारताला पाकिस्तानचा प्रचंड राग आहे आणि पाकिस्तानला आपल्या भारताचा. का ? तर काश्मीर मुद्दा आणि इतर बऱ्याच गोष्टी. यामुळे सीमेवर तणाव असतो आणि त्याचा परिणाम भारतात होतो.

दोनचार दिवसापूर्वी नितीन नांदगावकर या शिवसेना नेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एका हॉटेल चं नाव कराची आहे. म्हणजे मुंबई कराची नाव. हे खपवून घेतलं जाणार नाही अश्या प्रकारे व्हायरल झालेल्या व्हिडीओ मुळे सर्वत्र प्रतिक्रिया उमटली आहे.

अश्यात आता एक प्रसिद्ध अभिनेत्री बॉलिवूड मध्ये पदार्पण करतेय खरं पण जर मनसे किंवा इतर पुन्हा आक्रमक झाले तर पंचायत चं आहे म्हणा. पण आपल्याला आता त्या अभिनेत्रीचं नाव काय ? आणि वगैरे वगैरे अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता खूप लागलेली असेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

भारतातील अनेक मोठ-मोठे चित्रपट पाकिस्तानातही प्रदर्शित होतात. शिवाय पाकिस्तानमधील अनेक कलाकार भारतीय सिनेसृष्टीत झळकताना दिसतात. त्यामुळे आता नवीन अभिनेत्री आपल्या अभिनयाचा आविष्कार भारतीय सिनेमात दाखवणार आहे.

पाकिस्तान कलाकार बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या या यादीत आता आणखी एक नवं नाव जोडलं जात आहे. प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री एलिझे नासिर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती खूप सुंदर आणि हॉट अशी अभिनेत्री आहे.

तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘यारावे’ असं आहे. लवकरच दुबईमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. आणि तो येत्या नवीन वर्षाच्या शेवटला रिलीज देखील होण्याचं कळलं आहे.

एलिझे ही पाकिस्तान सिनेसृष्टीतील एक आघाडिची आभिनेत्री आहे. तिने तिचा तिथे एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वेगळाच ठसा उमटवला आहे.

खरतर तिने आधी अभिनयाचं क्षेत्रात पदार्पण केले नव्हतं. तिने मॉडलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण नंतर तिला वाटलं की आपण अभिनय करायला हवा आणि तिने काम सुरू केलं.

तीन वर्ष मॉडलिंग केल्यानंतर तिने अभियसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला. जो प्रसिद्ध अभिनेत्री पर्यंत येऊन पोहचला.

यापूर्वी लंडनमध्ये जाऊन तिने अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे. जे की घेतल्यानं अभिनयाचे बारकावे तिला चांगलेच कळलेले आहेत.

यलगार’ आणि ‘वॉर २’ या सुपरहिट पाकिस्तानी चित्रपटामध्ये ती झळकली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment