“पंढरीची वारी” चित्रपटातील “विठोबा” आठवतो का? मूक अभिनय करून सर्वानाच केले होते थक्क…पण २००२ साली..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो मराठी रंगभूमीवर अनेक लक्षवेधी चित्रपट प्रदर्शित होत असतात, काही चित्रपट तर इतके लोकप्रिय होतात की वर्षानुवर्षे त्यांची छाप रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. आज आपण अशाच एका लोकप्रिय चित्रपटाबद्दल खास माहिती घेणार आहोत, मित्रहो हा चित्रपट आपल्या लाडक्या विठुरायावर आधारित आहे. “पंढरीची वारी” या चित्रपटाने अनेकांना वेड लावले होते. चित्रपटातली अतरंगी पात्र आणि भक्तीमय वातावरण निर्माण करणारे काही सिन यामुळे हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. लोक आज सुद्धा हा चित्रपट खूप आवडीने आणि तितक्याच भावना गुंतवून पाहतात.

या चित्रपटात देव विठ्ठलाची अनेक गीते कानावर पडतात, या गीतातील बोल आणि सूर अमृतमय वातावरण निर्माण करतात. लोक आज देखील भक्तीत तल्लीन होताना यातील गीत ऐकण्यास पसंत करतात. “कांदा, मुळा ,भाजी अवघी विठाई माझी……”, “धरिला पंढरीचा चोर..” यांसारखी अनेक सुपरहिट गाणी या चित्रपटात आहेत. १९८८ साली हा चित्रपट पडद्यावर प्रदर्शित झाला होता, त्यावेळी थिएटर मध्ये अक्षरशः गर्दी मावत न्हवती, लोक मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहण्यास येत होते. चित्रपटातील अनेक सिन खूप गोड आहेत.

See also  "अगबाई सुनबाई" मधील शुभ्राची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा नवरा कोण आहे माहिती आहे का?

यामध्ये जयश्री गडकर, बाळ धुरी, राघवेंद्र काडकोळ, नंदिनी, राजा गोसावी, अशोक सराफ यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी काम केले होते. या चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांनी केली होती, आणि संवाद लेखन व दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केले होते. चित्रपटाच्या कथेत पंढरपूरची वारी दाखवण्यात आली आहे, यामध्ये जयश्री गडकर कुटुंबासोबत पंढरीच्या वारीला जात असताना वाटेत त्यांना एक चिमुकला भेटतो. हा चिमुकला येणाऱ्या अडचणींना दूर करत, या कुटुंबाचे संरक्षण करत असतो. या चिमुकल्याचे व त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे.

खास वैशिष्ट्य असे की चित्रपटात हा चिमुकला मूक दर्शविला आहे, त्यामुळे कोणताही संवाद त्याने इथे साधला नाही मात्र तरीही आपल्या मूक अभिनयाने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. त्याच्या निरागस पणाने तो सर्वांची मने कशी जिंकतो हे या चित्रपटातून दाखवले आहे. मूक अभिनय करून केवळ हावभाव वरून भूमिका सरकारने अतिशय अवघड काम आहे मात्र तरीही या बालकलाकाराने ही भूमिका उत्तमरीत्या पार पाडली आहे. त्याच्या अभिनयाची ताकद इतकी आहे की चित्रपटाच्या अखेरच्या क्षणी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.

See also  देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत “खमक्या आज्जीची” भूमिका साकारते ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

मित्रहो या चित्रपटात चिमुकला “विठोबा” झाले होते बकुल कवठेकर, हे या चित्रपटाचे दिवंगत दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचे सुपुत्र आहेत. या चित्रपटातून बकुल यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती, आजही ही चिमुकली भूमिका पाहण्यासाठी लोक आतुर असतात. पडद्यावर त्यांचे त्यावेळी मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते मात्र त्यानंतर ते फारसे कुठे पडद्यावर झळकले नाहीत. बकुलने पूढे पुण्यातील भारती विद्यापीठातून फाईन आर्टस् चे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवला. त्यांचे शिक्षण सुरू होते.

दरम्यान अचानक २००३ साली शिक्षण सुरू असतानाच त्यांचा हृद्यविकाच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने दुःख आजही सर्वाना होत असते, त्यांचे लहान भाऊ समीर कवठेकर हे याच क्षेत्रात निर्माते आहेत. त्यांनी “बकुल फिल्म्स” नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली आहे. बकुल जरी आपल्यात नसले तरीही विठुरायाच्या भूमिकेतून ते नेहमीच स्मरणार्थ राहतील. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या व्हायरल फोटोवर या अभिनेत्याने केली अशी कॉ'में'ट कि...
Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment