रात्री हॉटेल मध्ये काम करून सकाळी थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करायचा हा अभिनेता, आज आहे बॉलीवूडचा सुपरस्टार…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

गँगस ऑफ वासेपुर, स्याक्रेड गेम्स मधून प्रकाश झोतात आलेल्या अभिनेते पंकज त्रिपाठी बदल आपल्याला काही गोष्टी माहीत नसतील. खूप ग्रेट आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून पंकज त्रिपाठी यांना ओळखलं जातं.

बॉलिवूडचे दिगग्ज अभिनेते पंकज त्रिपाठी 5 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करतात. अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनय दाखविला आहे. नाव गाजवलं आहे. चित्रपटाच्या पडद्यावर त्यांनी आतापर्यंत बरीच पात्रे केली आहेत, ज्यांचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे.

प्रेक्षकांना त्यांचा कोणताही रोल फार आवडतो. पंकज त्रिपाठी हे आज बॉलीवूडचा नामांकित चेहरा आहे, पण एक काळ असा होता की चित्रपट क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टींशी परिचित करतो. ते चला मग आता जाणून घेऊयात त्यांच्या बद्दल.

पंकज त्रिपाठी यांचा जन्म बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील बेलसंद गावात झाला. गावातल्या छोट्या नाटकांमधून त्यांनी लहानपणी आपल्या अभिनयाची सुरूवात केली. पंकज त्रिपाठी यांनी आपल्या गावातल्या अनेक नाटकांत मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्यावर फिदा आहे ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री, या चित्रपटात...

तो काळ प्रेक्षकांना चांगलाच आवडला. मोठा झाल्यावर पंकज त्रिपाठी रात्री हॉटेलमध्ये काम करायचे आणि सकाळी थिएटरशी नाट्यगृहाशी जोडलेले राहायचे. सुमारे दोन वर्षे त्यांनी हे केले. शेवटी मी अभिनेता बनणारच असं त्यांनी ठरवलं आणि मुंबईत आले. पंकज त्रिपाठीच्या वडिलांनी त्यांना अभिनय शिकण्यासाठी पैसेही दिले नाहीत. शेवटी खिशातून मोकळा हात बाहेर निघेल या अवस्थेत ते बायकोला घेऊन मुंबईत आले.

त्याआधी त्यांचं शिक्षण बद्दल जाणून घेऊयात: पंकज त्रिपाठी यांनी हिंदीमधून पदवी पूर्ण केली. ते कॉलेजमध्ये असताना राजकारणात बरच सक्रिय होते. ते भाजपाच्या विद्यार्थी संघटनेच्या एबीव्हीपीचा भाग होते. राजकारण आणि अभिनय या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. पंकज त्रिपाठी यांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तुरूंगात जावे लागले.

तो एकदा त्याच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चळवळीचा एक भाग होता, ज्यामुळे त्याला सुमारे एक आठवडा तुरूंगात रहावा लागल होतं. अभिनयावर राजकारणाचा वाईट प्रभाव पडू नये म्हणून त्यांनी राजकारण करण्याचा रामराम घेतला. पंकज त्रिपाठी यांनी आपला अभिनय प्रवास मुख्यत्वे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) पासून सुरू केला. तिथं खरी मेख रोवल्या गेली. तिथून सुरू झालेला प्रवास त्यांना आज सुपरस्टार पर्यंत घेऊन आलेला आहे.

See also  या फोटोमधील चिमुकलीला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर, नाव जाणून थक्क व्हाल!

पैसे हा कुणालाही अडचण आणत असतो. जगणं अवघड करून टाकतो. पंकज बाबत ही तेच झालं. ती त्याकाळची गोष्ट. पंकज त्रिपाठी यांनी 2004 मध्ये एनएसडीमधून अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या एका मुलाखतीत पंकज त्रिपाठी म्हणाले होते की ते 16 ऑक्टोबर 2004 रोजी 46,000 रुपये घेऊन मुंबईला पोहोचले होते आणि 25 डिसेंबर 2004 पर्यंत त्याच्या खिशात एकूण 10,000 रुपये शिल्लक होते.

हा दिवस आठवताना पंकज त्रिपाठी म्हणाले की ही तारीख त्यांना कधीच विसरत नाही कारण हा दिवस त्यांच्या पत्नीचा वाढदिवस आहे आणि त्यादिवशी त्यांच्याकडे पत्नीसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते ना केक. अशी परिस्थिती उध्दभवली होती. तरी खचून न जाता त्यांनी त्यावर ही मात केली. एक दिवस नक्की आपला असेल असं मनाशी पक्क ठरवलं.

पंकज त्रिपाठी यांना 2004 मध्ये ‘रन’ या चित्रपटातून पहिली संधी मिळाली. या चित्रपटात त्याने अगदी छोटय़ा पात्राची भूमिका केली होती. यानंतर तो बर्‍याच चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसला, पण त्याच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉईंट २०१२ मध्ये आला.

See also  "गोलमाल" चित्रपटातील मुरलीची बायको आहे खूपच सुंदर, मुरली अगोदर या व्यक्तीची होती ती बायको...

२०१२ मध्ये पंकज त्रिपाठीने अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपुरमध्ये अभिनय केला होता. या सिनेमातील त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव सुलतान कुरेशी होते, जे प्रेक्षकांना खूप आवडले. गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटा नंतर पंकज त्रिपाठी रात्रभर प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्याने अनेक उत्तम चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये काम केले. पंकज त्रिपाठी यांनी हिंदी भाषेच्या दोन सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्स आणि मिर्जापूरमधील अभिनयाच्या कौतुकास पात्र ठरले. असा संघर्ष मय इतिहास आहे पंकज त्रिपाठी या अभिनेत्याचा. शेवटी संघर्ष करून त्यावर बीजय मिळवला तर यश मिळतं.

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment