पंकज त्रिपाठी यांनी पुन्हा एकदा जिंकले मन, सुट्टीत गेले गावी…आणि केली ही कामे…!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूड मध्ये अनेक कलाकार असे आहेत जे आपल्या साध्या राहणीमानाने खुप लोकप्रिय आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी चाहत्यांच्या आवडीच्या आहेत. पडद्यावर काम करून सर्वजण आपली ओळख निर्माण करतात, त्यातील बरेच जण आपल्या कामामुळे प्रसिद्ध असतात तर बरेच जण आपल्या सुंदरते मुळे, श्रीमंती मुळे प्रसिद्ध असतात. श्रीमंत झाल्यावर माणसाचे राहणीमान आपोआपच बदलते, त्यांच्या बोलण्यात वागण्यात बराचसा फरक येत राहतो मात्र याला अपवाद देखील अनेकजण असतात आणि यामध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी यांची देखील गणती होते.

पंकज यांनी हे दाखवून दिले आहे की हिरो हा फक्त पडद्यावर नसतो तर तो खऱ्या आयुष्यात देखील असतो आणि पडद्यावरील हिरो पेक्षा खऱ्या आयुष्यातील हिरो बनणे गरजेचे असते. पंकज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, वरचेवर त्यांच्या निरनिराळ्या पोस्ट पाहायला मिळतात त्यामुळे अनेक नेटकरी नेहमीच त्यांच्या प्रत्येक पोस्ट वर कमेन्ट करत राहतात शिवाय यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी चाहत्यांना कळते. चित्रपटात काम करून आजवर त्यांनी भरपूर पैसे कमावले आहे, अगदी भर मुंबईत सी फेसिंग अपार्टमेंट घेऊन देखील आपल्या मुळाशी पकड घट्ट बनवली आहे.

हल्ली पंकज त्रिपाठी आपल्या गावी सुट्टी साजरी करत आहेत, बिहारमधील गोपालगंज येथे स्थित असलेले बेसलंड या गावात आपली सुट्टी अगदी खास पद्धतीने साजरी करत आहेत. ट्विटरवर त्यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये पंकज अंगणात चूल पेटवून त्यावर भात व इतर जेवण बनवताना दिसत आहेत. त्यांना अस पाहून खरच लोक भावनिक झाले, इतका श्रीमंत माणूस असूनही आपल्या मातीशी, आपल्या जुन्या मित्रांसोबतची घट्ट मैत्री त्याने इतकी सुंदर जपून ठेवली आहे की कौतुक करण्यास कोणीही भाग पडेल.

See also  या ध'क्कादायक कारणामुळे शाहिद कपूर आणि त्याची पत्नी राहत आहेत एकमेकांपासून दूर, कारण ऐकून थक्क व्हाल!

हल्ली माणसे पैसे कमावण्यासाठी कितीतरी दूर जातात, पैसे कमावून झाले की सुविधा निर्माण करतात आणि त्यामध्ये स्वतःची एक दुनिया बनवतात पण या दुनियेत इतके दंग होऊन जातात की त्यांना आपल्या मायमातीत परत जावेसे वाटत नाही, हे लोक आपल्या आपल्या गावाला सहज विसरून जातात, आई वडिलांना विसरून जातात आणि बघता बघता हेच संस्कार कधी त्यांच्या मुलांमध्ये देखील रुजू होतात हे कळत नाही. पण ही परंपरा पुढे चालत राहिली की मग आपल्याला त्रास होतो हे जर थांबवायचे असेल तर आधी स्वतः आपल्या मातीशी नाते घट्ट बनवायला शिकले पाहिजे.

मित्रहो पंकज यांचा हा व्हिडीओ अतिशय सुंदर आहे, तो पाहून सर्वाना खूप छान वाटल. यावर अनेकांनी उत्कृष्ट कमेन्ट केल्या आहेत, शिवाय हा व्हिडीओ भरपूर लाईक देखील होत आहे. सोशल मीडियावर पंकज यांचे सर्वजण कौतुक देखील खूप करत आहेत, त्यांच्या या सवयीला अनेकांनी सलाम केला आहे. त्यांचे गावाशी असलेले नाते असेच घट्ट राहो ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  बॉलीवूड व्हिलन अमरीश पुरी यांची मुलगी आहे खूपच सुंदर, सुंदरतेचा बाबतीत बॉलीवूड अभिनेत्र्यांना देखील देते मात!
Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment