मुलगा आहे केंद्रीय मंत्री; आई-वडील करतात इतरांच्या शेतात मजुरी, जाणून घ्या सविस्तर माहिती

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नवी दिल्ली: 2 आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. या विस्तारात अनेक नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली. त्यापैकी एक आहेत एल मुरूगन. भाजपच्या तमिळनाडू युनिटचे अध्यक्ष असलेल्या एल. मुरूगन यांनाही या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्री बनवण्यात आले. एल मुरूगन यांनी बर्‍याच संघर्षांनंतर दिल्ली गाठली.

आजकाल मुरूगन यांच्या आई-वडिलांची चर्चा होत आहे. राजकारणापासून दूर असलेले त्यांचे आई-वडील तमिळनाडूमधील एका खेड्यात मजुरी करतात. मुरुगन यांच्या आई-वडिलांना आपल्या मुलाच्या यशाचा अभिमान आहे; पण त्यांना स्वतःचे आयुष्य जगायचे आहे. ज्याने त्यांना दोन वेळची भाकर दिली.

स्थानिक माध्यमांचे पत्रकार त्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा समजले की, मुरूगन यांचे आई-वडील तमिळनाडूमधील नमक्कल जिल्ह्यातील कोन्नुर या गावात काम राहतात. त्यांची आई 59 वर्षीय असून वडील 68 वर्षीय आहेत. मीडियाला मुरूगन यांच्या आई-वडिलांची भेट घेण्यासाठी अगोदर ते काम करत असलेल्या शेतीच्या मालकाची परवानगी घ्यावी लागली.

See also  जगातील 5 सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू... ज्यांच्या पुढे मोठ मोठ्या अभिनेत्री ही आहेत फेल..

मुलाच्या यशाचे श्रेय घेतले नाही…

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुरूगन यांच्या आई-वडिलांशी बोलत असताना त्यांनी आपल्या मुलाच्या यशाचे श्रेय घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, “आमचा मुलगा जर केंद्रीय मंत्री झाला असेल तर आम्ही काय करू शकतो. आम्ही त्याच्या कारकीर्दीतील यशासाठी काहीच केले नाही.”

एल मुरूगन यांचे नमक्कल जिल्ह्यात एक छोटे घर आहे. त्यांचे आई-वडील मिळेल ते काम करतात. कधी शेतात मजुरी तर कधी हमालीचे काम करतात. जेव्हा त्यांच्या शेजार्‍यांनी त्यांचा मुलगा केंद्रात मंत्री झाला आहे सांगितले तेव्हा ते दोघे शेतात काम करत होते. ही बातमी ऐकून ते खुश झाले मात्र त्यांनी काम करणे बंद केलं नाही. ते तसेच काम करत होते.

See also  अर्रर्र या अभिनेत्रीने केली आहे नाकाची शस्त्रक्रिया, तिला ओळखणे देखील होऊन बसले आहे कठीण!

कर्ज घेऊन मुलाला शिकवलं…

मुरुगनच्या वडिलांनी सांगितले की त्यांचा मुलगा अभ्यासात खूप चांगला होता. तो सरकारी शाळेत शिकला. त्यानंतर मुरुगन यांनी चेन्नईच्या आंबेडकर लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांना मित्रांकडून कर्ज घ्यावे लागले. भाजपाच्या तामिळनाडू युनिटचे अध्यक्ष झाल्यानंतर मुरुगन यांनी आपल्या पालकांना चेन्नईत राहण्यास बोलावले होते, परंतु काही दिवसांनी ते परत गावी आले.

त्यांच्या आई म्हणाल्या की, “आम्ही कधीकधी चेन्नईला तीन-चार दिवसासाठी जायचो, पण आम्ही मुलाच्या व्यस्त जीवनशैलीसोबत स्वतःला जुळवू शकलो नाही. म्हणून आम्ही परत आमच्या गावी कोन्नूरला आलो.”

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment