पाठकबाई परत येणार! होणार धमाकेदार एंट्री, साकारणार हि भूमिका, ऐकून थक्क व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

झी मराठी वाहिनीवरील “तुझ्यात जीव रंगला” या लोकप्रिय मालिकेतील राणा दा आणि अंजली पाठक यांची जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडली. अर्थातच या मालिकेने आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. यामधील राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी हा सध्या “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” यामध्ये अभिनय साकारत आहे. त्यामुळे आता चाहते राणा दा च्या पाठकबाईंना खूप जास्त मिस करत आहेत.

तर मित्रांनो आपल्या पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर या “तुझ्यात जीव रंगला” मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरांत प्रसिद्ध झाली. अतिशय कमी कालावधीतच तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले. ही मालिका संपून आता बराच कालावधी लोटला तरीही अक्षयाला आजही तिचे चाहते पाठकबाई या नावानेच ओळखतात. तुम्हांला ठाऊक आहे का, लवकरच आपल्या अंजली बाई आपल्याला भेटायला येत आहेत.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेयर केले सासरच्या घरच्यांचे फोटो, पाहून थक्क व्हाल!

आपल्याला तर माहीतच आहे की, महाराष्ट्राला विनोदी भूमिका साकारण्याची खूप मोठी परंपरा आहे. संत एकनाथ महाराजांच्या भारूङापासून ते बुरगुंङा पर्यंत किंवा प्रल्हाद केशव अत्रे, पु.ल.देशपांङे ते वर्हाङकर आणि ङॉ. लक्ष्मण देशपांडे पर्यंत. परंतु प्रत्येक व्यक्ती ही कधी ना कधी अशा एकपात्री भूमिका साकारते. जसे की नाक्यावर, चौकात, चहाच्या टपरीवर, कट्ट्यावर, मित्रांच्या पार्टीत इ. ठिकाणी ह्या गोष्टी अतिशय रंगून सांगितल्या जातात.

अशाच प्रकारे काही सेलिब्रिटींच्या आयुष्यातील गोष्टी ह्या सामान्य लोकांना माहीत नाही. अशा भन्नाट गोष्टींचा फङ हा झी मराठी वाहिनीवर रंगणार आहे. यामध्ये अगदी बॉलीवुड मधील शाहरुख खान पासून ते अगदी शरद केळकर पर्यंत, सुनिल गावस्कर पासून सुनिल बर्वे पर्यंत, त्यांच्या व्हॅनिटीतील, नाटकाच्या विंगेतील, नाटक सिनेमाच्या गल्ल्यापासून ते अगदी लग्नापर्यंत…अशा अनेक अंतरंगी किस्स्यांची मैफिल आता रंगणार आहे.

See also  "अग्गंबाई सासूबाई" मालिका सोडल्यानंतर बबड्या आता करत आहे हे काम, पाहून थक्क व्हाल!

झी मराठी वाहिनीवर अतिथी म्हणून सिद्धार्थ जाधव, सैराट फेम तानाजी गलगुंङ हे दिसतील. त्याचसोबत तुझ्यात जीव रंगला फेम पाठकबाई म्हणजेच आपली आवडती अभिनेत्री अक्षया देवधर ही सूत्रसंचालन करताना पाहायला मिळेल. त्यामुळे तिच्या चाहत्यांना याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment