पवनदीप आणि अरूणिता यांच्या नात्याची होत आहे देशभरात चर्चा, त्यांच्या घरच्यांनी घेतला चक्क हा निर्णय
इंङियन आयङॉल 12 चा विजेता पवनदीप राजन आणि स्पर्धक अरूणिता कांजीलाल हे आज एक नामांकित कपल बनले आहे. हल्ली हे दोघेही आपल्या लेटेस्ट लव्ह ट्रॅक “मंजूर दिल” मुझे चर्चेत आहेत. हे गाणे 23 ऑक्टोंबर रोजी रिलीज झाले. त्यामुळे चाहते या गाण्यामुळे खूप खुश आहेत. हे गाणे पवनदीप आणि आशिष कुलकर्णी यांनी लयबद्ध केले आहे.
तसेच अरूणिता आणि पवनदीप यांची जोडी सुद्धा चाहत्यांना सुद्धा भरपूर आवडते. म्हणून तर लोक त्यांना रब ने बना दी जोडी असे देखील म्हणतात. मात्र यादरम्यान पवनदीप आणि अरूणिता यांच्या घरच्यांनी त्यांना महत्त्वाच्या सूचना पण केल्या आहेत. जसे की आपल्याला माहितच आहे की, इंडियन आयङॉल 12 मध्ये पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलाल यांनी खूप लोकप्रियता मिळवली. यादरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. हेच चाहते त्यांना #AruDeep या नावाने ओळखत होते.
मात्र या दोघांनीही आपल्या नात्याची कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही. ते एकमेकांना फक्त चांगले मित्र म्हणूनच संबोधतात. मीडिया रिपोर्टस् नुसार पवनदीप आणि अरूणिता यांच्या कुटुंबीयांनी त्यांना स्वतःच्या गायनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. तसेच हा रियालिटी शो संपल्यावर सुद्धा ही जोडी खूप लोकप्रिय आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्यातील रोमॅन्टिक अँगल सुद्धा नेहमी आपल्याला पाहायला मिळतात.
पवनदीप राजन हा मूळचा उत्तराखंड चा आहे. आपल्या शो च्या पहिल्याच दिवशी त्याने सर्वांची मने जिंकली होती. त्याने सांगितले होते की,”मला लहानपणापासून गाण्याची आवड आहे.” 27 जूलै 1996 रोजी उत्तराखंड च्या चंपावत जिल्ह्यात जन्मलेल्या पवनदीप राजन याने देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे.
मीडियाच्या माहितीनुसार पवनदीप हा सुमारे 10-20 लाख रुपए कमावतो. इतकंच नव्हे तर 2016 मध्ये उत्तराखंड सरकारने त्याला युथ ब्रँड ॲम्बेसेङर म्हणून घोषित केले होते. त्याचप्रमाणे इंङियन आयङॉलचे विजेतेपद पटकाविण्याआधी त्याने “द व्हॉईस ऑफ इंडिया शो” चे विजेतेपद सुद्धा पटकावले आहे.
तर दुसरीकडे अरूणिता कांजीलाल हिने आपल्या वयाच्या 8 व्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती. तिचे लहानपणापासूनच एक प्रसिद्ध गायिका बनण्याचे स्वप्न होते आणि आता तिची खूप गाणी वाजत आहेत. या दोन्ही स्टार्स ची फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणात आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.