नवरीबाईचा “नो मेकअप” लुक होतोय लोकप्रिय… पायल रोहतगी अडकली विवाहबंधनात…!!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो हल्ली लग्नाचा सिझन सर्वत्र आहेच, अनेक जोड्यांची सात जन्मासाठी गाठ बांधली जात आहे. आता यामध्ये आणखी थोडी भर पाडत सुप्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपट्टू संग्राम सिंह या दोघांनी केले लग्न. त्यांची ही गोड बातमी सर्वत्र व्हायरल झाली असून त्यांचे अनेक चाहते ही बातमी जाणून खूप खुश आहेत , इतकेच नसून त्यांना अनेक गोड गोड शुभेच्छा देत आहेत. पायल आणि संग्राम (९जुलै) शनिवारी विवाहबंधनात अडकले आहेत. हा लग्नसोहळा अनेकांना आकर्षित करणारा ठरला आहे.

अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा चांगला थाटात पार पडला आहे. हा सोहळा आग्रा येथील जेपी पॅलेस मध्ये पायल संग्रामने लग्न करण्याचं ठरलं होतं आणि त्यांनी ठरवलेल्या ठिकाणीच हा शाही लग्नसोहळा अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या वर्षावात पार पडला आहे. या सेलिब्रेटींच्या लग्नाचे खूपसे छान छान फोटो सोशल मीडियावर लक्षवेधी ठरत आहेत. मित्रहो हे कपल खूपच खास आहे, जवळपास गेली १२ वर्षे हे दोघे एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकमेकांवर खूप खूप प्रेम करतात, त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

See also  बॉलीवूड अभिनेता अजय देवगणला आली कर्ज घेण्याची वेळ, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

१२ वर्षानंतर आता या दोघांनी आपली लग्नगाठ बांधली आहे. पायलने लग्नात लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. हा लेहंगा खूपच आकर्षित करणारा ठरला आहे, यावर खूप वर्क केले आहे. त्यामुळे हा खूपच सुंदर दिसत असून यामध्ये पायल देखील खूप गोड दिसत आहे. तसेच संग्रामने डिझायनर शेरवानी आणि फेटा परिधान केला आहे. त्याच्यावर ही शेरवानी अतिशय खुलून दिसत आहे. दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत, ही जोडी अनेकांची दिवसेंदिवस लोकप्रिय बनत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.

पायल नवरीच्या रुपात खूप गोड दिसत आहे, तिने महागडा लेहंगा आणि दागिने परिधान केले आहेत. मात्र तिच्या लुकची खासियत अशी की तिने स्वतःच्या लग्नात नो मेकअप लुक ठेवला आहे. तिचा हा लुक प्रचंड चर्चा रंगवत आहे, अनेकांना तिने मेकअप का नाही केला असे प्रश्न पडत आहेत. त्यामुळे खूपसे लोक यावर कमेन्ट करत आहेत, कमेन्ट मध्ये विचारत आहेत “स्वतःच्याच लग्नात मेकअप का नाही केला?”. पण मित्रहो मेकअप न करण्याच कदाचित पायलने ठरवलं असावं. पण विना मेकअप देखील ती प्रचंड आकर्षित करत आहे.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने चो'र'ला होता विमानामधील सूट, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

त्यांच्या लग्नामुळे दोन्ही घरचे सदस्य खूप आनंदी आहेत, कुटुंब आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थिती मध्ये लग्न करायचं अस पायल आणि संग्रामच आधीच ठरलं होतं. पण १२ वर्ष डेट करूनही पायल संग्रामशी लग्न करायला नकार देत होती, याचे कारण तिने कंगना रनौतच्या “लॉकअप” शोमध्ये सांगितले होते, ते असे की ती कधीच आई बनू शकत नाही. मात्र तरीही संग्रामचे तिच्यावर असणारे प्रेम किंचितही कमी झाले नाही. अखेर दोघांनी लग्न करून सर्वाना गोड बातमी देत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. त्यांची ही सुरुवात आयुष्यभर गोड राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  या बॉलिवूड अभिनेत्री अजूनही केले नाही लग्न, एक तर म्हणते मला माझ्या मनासारखा नवरा भेटाना...
Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment