फक्त एका रात्रीत प्रसिद्ध झाले होते हे सेलिब्रिटी, पहा आता काय करतायत…
सध्या लोन कधी व्हायरल होईल याचा काहीच भरवसा देता येत नाही. कारण हे जगच आता इंटरनेट आणि सोशल मिडीयाचं बनलेलं आहे. सोशल मीडिया हे असेच एक व्यासपीठ आहे. जिथे रोज काहीतरी व्हायरल होत असते. आजकाल ‘बचपन का प्यार’ हे गाणे व्हायरल होत आहे. ते गाणे एवढे व्हायरल झालेलं आहे की त्याला त्यांच्या राज्यातील मुखमंत्री यांनी भेटून सत्कार केला. तसेच त्याची म्हणजे त्या पोराची मिरवणूक देखील काढली गेली.
तसेच हे गाणे गाणाऱ्या सहदेवला स्वतःसोबत गाण्याची संधी बॉलीवूड मधी सिंगर ने दिली. आता अनेकांचे स्वप्न असते कि मी खूप मोठे व्हावे; पण सहज ते काही शक्य नसते; पण एखादा आवड म्हणून करतो आणि एका रात्रीत जगभर लोकप्रिय होऊन जातो. हि किती मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सांगणे हेही गरजेचे आहे की सहदेव एकमेव नाही ज्याला ही संधी मिळाली. या यादीत आणखी कोणाचा समावेश आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
एक डान्स मागे काही दिवसांपूर्वी प्रचंड व्हायरल झाला होता, ज्याला एक दोन वर्ष झाले असतील. कोरोनाच्या आधी. त्या अंकल चे नाव आहे डब्बू अंकल. आज डब्बू अंकलला कोण बरं ओळखत नाही? असाच कुणीच नसेल की त्याने त्याच्या मोबाईल मध्ये अंकल चा डान्स पाहिला नसेल.
लग्नात ‘आप के आ जाने से’ या गाण्यावर नाचून प्रसिद्धीझोतात आलेले डब्बू अंकल आता सेलिब्रिटी बनले आहेत. संजीव श्रीवास्तव यांना सलमान खान आणि गोविंदा यांना त्यांच्या नृत्य प्रतिभेद्वारे भेटण्याची संधी मिळाली. डब्बू अंकल हे मध्य प्रदेशात राहणाऱ्या संजीव कॉलेजचे प्राध्यापक आहेत. बघितले का एका रात्रीत त्यांचे करीयर झालं.
दुसरा आहे सहदेव दिरडो. जो अजूनही ट्रेंडीग करत आहे. खूप व्हायरल झाला होता तो. ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे’ हे गाणे आजकाल प्रत्येकाच्या जिभेवर आहे. या सगळ्या दरम्यान, सहदेव कुमार यांचे एक नवीन गाणे सोशल मीडियावर ट्रेंड आहे. सहदेव यांचे नवीन गाणे ‘हम तुम प्यार में दुबे’ चा नवीन व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. आणि लोक उघडपणे त्यावर रील बनवताना दिसतात. म्हणजे आता इथून पुढे सहदेव काही थांबणार नसल्याचे दिसून येत आहे.
तिसरी आहे कडक डोळा मारणारी प्रिया प्रकाश वरियर. जिचे करियर एवढं सेट झालं की करोडो रुपये आले, फिल्म्स ऑफर झाल्या. भारताची क्रश बनली. आपल्या एका व्हायरल व्हिडीओने रातोरात सोशल मीडिया स्टार बनलेल्या प्रिया प्रकाश वारियरला ‘विंक गर्ल’ म्हणून ओळखले जाते. तथापि, प्रियाला क्वचितच वाटले असेल की चित्रपटातील एक दृश्य तिला राष्ट्रीय क्रश करेल. ही ताकत आहे व्हायरल होण्यात.
चौथा आहे अमन राज. कलर्स टीव्हीच्या डान्स रिअॅलिटी शो, रांची मधील ‘डान्स दिवाने’ चे स्पर्धक अमन राज यांचा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे. अमन राज गोविंदाच्या अभिव्यक्ती आणि नृत्याचा मोठा चाहता आहे आणि तो मोठा झाल्यावर नृत्यदिग्दर्शक बनू इच्छितो. डान्सच्या वेड्यामुळे अमन पहिल्यांदाच मुंबईत आला आहे. यापूर्वी त्याने रांची येथे डान्स दिवानेच्या दुसऱ्या सीझनसाठी ऑडिशन दिली होती. त्याने या ऑडिशनच्या दोन फेऱ्याही पूर्ण केल्या होत्या. तर आता तो खूप व्हायरल होत आहे. चर्चेत येत आहे.
अचानक पणे व्हायरल झालेल्या रानू मंडल ला कोण नसेल ओळखत जिला हिमेश रेशमिया ने काम देऊन लोकप्रिय सुद्धा केले. रानू मंडल हे एक असे नाव आहे की जी एकेकाळी रोज रेल्वे स्टेशनवर गाणे गात असायची; पण कोणीतरी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि शेअर केला. व्हिडिओ इतका व्हायरल झाला की हिमेश रेशमियाने तिला गाणे गाण्याची संधी देखील दिली. रानूने तेरी मेरी कहानी हे गाणे गायले आहे.
तर हे होते व्हायरल झालेले हे सुपरस्टार. तर असे आपण ही होऊ शकता व्हायरल. करत रहा प्रयत्न. नवीन काहीतरी प्रेक्षकांना द्या. तरच आवडेल. बाकी आजसाठी एवढेच. लवकर भेटू नवीन माहिती सोबत तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा आणि वाचत रहा स्टार मराठी.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.