‘प्रेम करते तुझ्यावर…, आय लव्ह यू’, सैराट फेम पारश्याने शेअर केला लेटरचा फोटो, जाणून घ्या कोण आहे ‘ती’ ?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या सोशल मीडियाच्या या अफलातुन जगात केव्हा, कधी, काय होईल याचा काही नेम नाही बुवा…असेच काहीसे हल्ली आपला लाडका हँडसम अभिनेता आकाश ठोसर याच्या बाबतीत घडले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या “सैराट” या चित्रपटातून अगदी एका रात्रीत प्रसिध्दीत आलेला आपला परश्या म्हणजेच आकाश ठोसर हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो.

काही दिवसांपूर्वीच तो मिस्ट्री गर्ल सोबतच्या फोटोमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर आता त्याने चक्क सोशल मीडियावर एक लव्हलेटर शेयर केले आहे. त्यामुळे हे नक्की काय प्रकरण आहे, याची उत्सुकता आकाशच्या सर्व चाहत्यांना लागून राहिली आहे. काय मग राव…..तुम्हीपण हा विचार करत आहात का?? आकाशचं कुणासोबत प्रेमप्रकरण तर नाही ना.. नेमकी ही भानगड काय आहे बुवा…चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया, आकाश ठोसर आणि लव्हलेटरचे हे नवं प्रकरण…

See also  'माझा होशील ना' मधील या अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर होत आहे प्रचंड व्हायरल...

सोशल मीडियावर वायरल होत असलेले हे लव्हलेटर याची सर्वत्र प्रचंड प्रमाणात चर्चा होत आहे. कारण हे लव्हलेटर ज्या व्यक्तीसाठी लिहिण्यात आले आहे, त्याचे नाव ‘आ’का’श’ असे आहे. या लेटर मध्ये असे लिहिण्यात आले आहे की, “प्रिय आकाश, तू मला प्रपोज केले आणि त्यानंतर मी तुला जे काही म्हटले, त्यासाठी आधी मी तुला खूप खूप सॉरी म्हणते. त्यानंतर मी मनात विचार केला आणि माझे मन मला सांगत होते की, तो तूच आहेस…ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होते. जर माझ्या आधीपासून तुला कुणी आवडत असेल, तर तू मला नाही म्हटले तरी चालेल. तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर तू मला ‘हो’ म्हण. मी तर माझे हृदय तुला दिले आहे. तू पण तुझे हृदय मला दे. तुला माहित नाही की, मी तुझ्यावर किती प्रेम करते….फक्त तुझीच अंकिता..”

See also  अभिनेत्री अक्षया देवधरसोबतच्या ब्रेकअपबद्दल अभिनेता सुयश टिळकने केला मोठा खुलासा, म्हणाला, "माझे ब्रेकअप..."

हे अफलातुन लेटर जेव्हा सोशल मीडियावर वायरल झाले, तेव्हा आकाश ठोसर च्या अनेक चाहत्यांनी हे लेटर आपल्या लाडक्या आकाशसाठीच असेल, असे समजून त्यालाच पर्सनली मेसेजमध्ये हे लव्हलेटर पाठवले. बहुतेक जणांनी ते लव्हलेटर आपल्याला पाठवले आहे, हे आकाशने पाहिले. तेव्हा आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याने हे लव्हलेटर शेयर करत सांगितले की,”मित्रांनो हा आकाश मी नाही….सगळेजण हे लव्हलेटर मलाच पाठवत आहेत. कृपया गैरसमज करून घेऊ नका.”

अभिनेता आकाश ठोसर याने सैराटनंतर एफ्यू : फ्रेंडशिप अनलिमिटेड या सिनेमात काम केले आहे. तसेच हिंदी वेबसिरीज लस्ट आणि 1962 : द वॉर इन द हिल्स मध्ये तो झळकला होता. त्याचप्रमाणे नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन अभिनीत झुंङ या चित्रपटात आकाश झळकणार आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू ही देखील त्याच्यासोबतच आपल्याला पाहायला मिळणार आहे.

See also  करोडपती व्यक्तीची पत्नी गेली प्रियकरासोबत पळून, पैसे संपल्यावर आली परत, मात्र नंतर जे झाले ते.....

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment