हरलीन देओलने पकडलेल्या कॅचचे पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक, पहा व्हिडीओ
नवी दिल्ली: सध्या भारतीय महिला संघ इंग्लंड दौर्यावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघा दरम्यान झालेल्या पहिल्या T-20 सामन्यात पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे डकवर्थ लूईस नियमांनुसार सामन्याचा निकाल लावण्यात आला. यात भारतीय संघाचा 18 धावांनी पराभव झाला. मात्र, या सामन्यात भारतीय खेळाडू हरलीन देओल हिने पकडलेल्या कॅचची जगभरातून वाहवा होत आहे. इंग्लंड संघाने सामना जिंकला असला तरीही त्यांच्यापेक्षा हरलीन देओल हिने पकडलेल्या कॅचची चर्चा जास्त होत आहे.
असा पकडला कॅच
इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना एमी जोन्स ने जोरदार फटका मारला. त्यावेळी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेल्या हरलीन देओलने चेंडूवर लक्ष केंद्रीत केलं. चेंडू सीमापार होणार याचा अंदाज आल्यावर तिने अतिशय शिताफीने तो चेंडू झेलला. मात्र आपण चेंडूसोबत स्वतः सीमारेषेबाहेर जात आहोत हे लक्षात येताच तिने तो चेंडू स्वतः हवेत उडी मारत सीमारेषेच्या आता उंच फेकला व पुन्हा स्वतःचे संतुलन सांभाळत सुर मारत कॅच पकडला.
हरलीनने ही कॅच पकडल्यानंतर फक्त भारतीय क्रिकेट रसिकच नाहीतर जगभरातील करोडो क्रिकेट रसिकांनी तिचे कौतुक केले. या कॅचला महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात उत्कृष्ट कॅचपैकी एक म्हणण्यात येत आहे.
इंस्टाग्रामवर मोदींनी केलं अभिनंदन
या कॅचची दाखल पंतप्रधान मोदी यांनीही घेतली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांनी हरलीनच्या कॅचचा विडियो शेअर करत एक अप्रतिम कॅपशनही दिले आहे. त्यांनी हरलीनला टॅग करत “अभूतपूर्व, अभिनंदन”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
इथे पहा कॅचचा विडियो
A fantastic piece of fielding 👏
We finish our innings on 177/7
Scorecard & Videos: https://t.co/oG3JwmemFp#ENGvIND pic.twitter.com/62hFjTsULJ
— England Cricket (@englandcricket) July 9, 2021